काय हवंय मला



म्हणे
,
नक्की हवंय काय तुला?!
म्हटलं,
थांब तरी जरासांगते!

धीराने थोडा बैसलास,
तर मीही मन सावरते!

अपेक्षा?
तशा नाहीतच रे!
फक्त
प्रेमानं तू पुसावं..

तुझ्या महत्त्वाच्या यादीत
एक माझंही नाव असावं.

आहेच म्हणशीलच तू
मग तसं दिसत का नाही..
मी बोलताना उपऱ्यांचा
फोन decline का होत नाही?

हो!
आहेच मी इथे;
म्हणून
सतत ignoreनको ना करू!

माहितीये,
भिंती सारं बघतात..
आताशा,
त्याही लागतात रडू!

एकटी एकटी रहाते रे मी
साऱ्या तुझ्या जगामध्ये..!
शोधत रहाते आपलेपणा
माझ्या खऱ्या माणसांमध्ये.

सारं करतोस आमच्यासाठी
कबूल आहे मला
पण तुझ्याशिवाय स्वर्गात ह्या
घुसमटायला होतं मला

थांबशील थोडापळताना..
बैस कधीतरी शेजारी..
जमल्यास घे हात हाती,
सांग दडलेले तुझ्या उरी.

मी तुझीइथे तुझ्याचसाठी
परकी कुणी नाही रे!
तुझ्या आपल्या माणसांमध्ये
मला दूर लोटू नको रे..
मला दूर लोटू नको रे..

प्रज्ञा वझे घारपुरे

1 comment: