प्रशासनातील एक अनुभव

माझ्या नोकरीत मला प्रशासकीय पदावर काम करण्याची बरीच संधी मिळाली. प्रशासनात कधी रागवावं लागतंकधी मेमो द्यावा लागतोतर कधी गोड बोलत समजूत काढावी लागते. वेळ निभावणे महत्वाचे. आपण नियमाला धरून काम करतो म्हणजे आपल्याला त्रास होणार नाहीहा आपला समज. वाद मिटवून काम करून घेणे हीच खरी कसोटी.

मी डी.एड. कॉलेजधर्माबाद इथे प्राचार्य  असतानाची गोष्ट. २००८/९ असेल. डी.एड.च्या विद्यार्थ्यांनी संप पुकारला त्याची! डी.एड.चे मूल्यमापन त्या वेळेला ६०० लेखी + ४०० अंतर्गत असे १००० मार्कांचे असायचे. आणि त्या वर्षीपासून प्रथमच गुणपत्रिकेवर दोन्ही मार्कांचा उल्लेख चालू झाला होता. प्रथम वर्षाच्या मार्कांची वाट न पाहतादुसऱ्या वर्गात तात्पुरता प्रवेश देऊनसत्र चालू केलेले होते. प्रथम वर्षाचेही वर्ग चालू झाले होते. अशातच दुसऱ्या वर्षाचा निकाल आला - गुणपत्रिका वाटल्या. मुलांमध्ये रिझल्टची चर्चा चालू झाली. अंतर्गतचे गुण पहिल्यांदाच गुणपत्रिकेवर आल्याने मुलेही खुश होती.

दुपारी अचानक द्वितीय वर्षाच्या वर्गात गोंधळ चालू झाला. टेबल-खुर्च्या सरकावण्याचे आवाज येऊ लागले. एक शिपाई धावत आला आणि म्हणाला - "मुलांनी बोलगुलवार सरांना वर्गात घेऊन दार लावून घेतले आहे!!"  एका सिनियर प्राध्यापकांना बरोबर घेऊन मी गेले. दार वाजवून मी पोलिसांना बोलावण्याची धमकी दिल्यावर मुलांनी दार उघडले आणि बोलगुलवार सर धावतच बाहेर पडले. "हा काय प्रकार आहे ?"  म्हणून दरडावून   विचारल्यावर एक जण म्हणाला, "मॅडमआम्हाला अंतर्गतमध्ये कमी गुण दिले आहेत."  मीपण जरा जोरातच म्हटले, "मी निकाल पहिला आहे. ७० ते ८० च्या रेंज मध्ये सर्वांनाच गुण आहेत." "पण मॅडमखाजगी कॉलेजमध्ये हेच गुण ९०-९५ आहेत. आम्ही नियमित कॉलेज करतो. आमचं  काम चांगलं  असतं. तरी आम्ही ८० मध्येच लटकलो आहोत."  प्रकरण मिटवायला मी म्हटले, "चला आता वर्गात जाऊन बसा. तुमची ही कसर मी द्वितीय वर्षात भरून काढायला प्राध्यापकांना सांगते."

पण मुले वेगळ्याच मूडमध्ये होती. ती म्हणाली, "आम्ही वर्गात जाणार नाही. आम्ही संपावर चाललो आहोत." "अरेपण संप करायला नोटीस द्यावी लागते. ती तुम्ही कुठे दिली आहेतुमचा संप बेकायदेशीर ठरू शकतो!!"  पण मुले काही ऐकायच्या मन:स्थितीत नव्हती हेच खरे.

मी नांदेडला फोन केला. डी.आय.ई.टी. - आमची जिल्ह्याची वरिष्ठ संस्था. तिथेही हीच परिस्थिती. वसमतलातूरपरभणी - सगळ्याच डी. आय. ई.टी.च्या संलग्न शासकीय संस्थांमध्ये हाच गोंधळ. नांदेडमध्ये शिक्षण सम्राटांची कमतरता नाही. खाजगी संस्थांचे पेव फुटलेले. त्यांच्या कारभाराबद्दल न बोललेलेच बरे अशी परिस्थिती. मुलांचा हा संप कसा मिटवावा या विवंचनेत मी होते. काही मुले  आली. त्यांचेही तेच पालुपद. मी समजूत काढायच्या सुरात सांगून पहिले, "... अरेखाजगीतला सगळा कारभार पैशांवर चालतो. म्हणून नोकरीच्या वेळी आपल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळते का नाही? " तर त्यातला एक जण म्हणाला, "आम्हालाही पैसे मागितले होते."  मला जरा राग आला, "बिनबुडाचे आरोप करू नका. मला नावं  सांगा - मी कारवाई करते.तर तो म्हणतो, “तुम्ही जर उद्या डी.आय. ई.टी.च्या मीटिंगमध्ये जाणार असाल तर सांगतो!मी म्हटले, "मला काही फोन नाही. तुम्हाला काय माहित?"  तो जरा हसला - "आमचे नेटवर्क जास्त  पक्के आहे. बघा तुम्हाला फोन येतो का नाही."  मी म्हटले, " ठीक आहे. मला लिखित नावे  दे. मी मीटिंगमध्ये मांडते."  त्याने दोनचार नावे सांगितली, पण लेखी काही दिली नाहीत.

त्याने म्हटल्याप्रमाणे खरंच जिल्हा कॉलेजमधून फोन आला! दुसऱ्या दिवशी सकाळी मीटिंगला हजर रहा असा निरोप होता. दुसऱ्या दिवशी पूर्ण नांदेड जिल्ह्यातील शासकीय कॉलेजेसचे विद्यार्थी जमले होते. बाहेर त्यांची नारेबाजी आणि आत त्यावर आमची शेरेबाजी अशी मीटिंग झाली. सगळाच गोंधळ. मीटिंग संपल्यावर डी.ई.आय.टी.च्या प्राचार्यांनी मला बाजूला घेऊन म्हटले,  “तुमचे विद्यार्थी म्हणत होते की  शिक्षकांनी पैसे मागितले.” मी म्हटले, "माझ्याकडे लेखी काही तक्रार नाही. मी तशी माहिती मागितल्यावर ते विद्यार्थी गायब झाले! आणि काही लेखी पुरावा नसताना सांगोवांगीवर का कुणावर दोषारोप ठेवायचाम्हणून मी नावे सांगितली नाहीत."

परत धर्माबादला आले आणि दुसऱ्या दिवशी एक वार्ताहर आला. मला संपाबद्दल विचारायला लागला. म्हटलं तुम्हाला जे दिसते आहे त्यापेक्षा माझ्याकडे आणखी काही सांगण्यासारखे नाही. दोन मिनिटे शांत बसून तो म्हणाला, "मॅडम तुम्ही शिक्षकांची नवे सांगा - आपण छापून टाकू!
"
कोणती नावेमाझ्याकडे काहीही  नावे  नाहीत "
"
बरं  - मग मला त्या विद्यार्थ्यांची नवे द्या ज्यांनी संपासाठी इतरांना चिथावले. त्यांना रस्टीकेट  करायचा विचार चालू आहे - असे छापून टाकतो.
ते ऐकून माझी तळपायाची आग मस्तकात गेली. मी इथे मुलांची समजूत काढून संप मिटवायचा प्रयत्न करत होते - आणि हा पत्रकार म्हणवणारा निघाला होता आगीत तेल ओतायला. मी संतापून त्याला विचारले, "तुम्ही पत्रकार आहात की दलालमाझ्याकडून यादी घ्यायचीआणि मग संबंधितांकडून ती न छापण्याचे पैसे घ्यायचे हाच विचार असणार तुमचा. चला, चालते व्हा. शिक्षकही माझेच आहेत आणि विद्यार्थीही. परत कॉलेजमध्ये पाय टाकलात तर तुमच्या संपादकांकडे तक्रार करेन की  तुम्ही सरकारी कामात अडथळा आणता आहात.तो सटपटलाच आणि निघून गेला.  

जरा हुश्श करते आहे  तेवढ्यात दोन विद्यार्थी आले आणि म्हणाले, "उद्या अभाविपचे जिल्हा अध्यक्ष  तुम्हाला भेटायला येतील. १२.३० ची वेळ मोकळी आहे नाठेवाल का ?" ही  एक नवीच आफत! मी त्यांना हो तर म्हटलं,  पण हेही सांगितलं, "तुमचा रिझल्ट लागला आहे. गुणपत्रिका आल्या आहेत. विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे आता तुमच्या अंतर्गत गुणांच्या संदर्भात परीक्षा मंडळ कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा.विद्यार्थी तर गेले - पण मी विचार करायला लागले की ही  डोकेदुखी थांबवायची कशीमग एक विचार आला - मी रिझल्ट क्लार्कला रिझल्ट घेऊन बोलावले. सगळी यादी एकदोनदा तपासून पहिली. मग माझ्या परीक्षा प्रमुखांना बोलावले. त्यांना म्हटले, "जोशी सरही यादी बघा आणि मला तीन प्रश्नांची उत्तरे द्या.त्यांना काही कळेना - तेव्हा म्हटले, "अहो जरा बसा. सांगते...

ते आणि क्लार्क जरा सावरल्यावर मी म्हणाले,  "जोशी सरजरा यादी बघा आणि सांगा -  की असे किती विद्यार्थी आहेत ज्यांना लिखित जास्त आणि अंतर्गतमध्ये कमी गुण आहेत. दुसरं - ६० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेले किती ? आणि तिसरे अगदी काठावर - म्हणजे - ५० टक्के असणारे विद्यार्थी किती?".  जोश्यांनी यादी न पाहताच सांगितले, "असे कोणीही नाहीत. मी स्वतः हा रिझल्ट तयार केला आहे. मला माहीत आहे."  मी म्हणाले, "सरपरत एकदा बघा आणि सांगा. मग सरांनी आणि त्या क्लार्कनी परत यादी बघितली आणि दहा मिनिटांत येऊन सांगितले, "मॅडम मी सगळा रिझल्ट पहिला - पण तुम्ही म्हणता तशी कोणीच मुलं  नाहीत."  मी म्हटलं, "मला माहीत होतं  ते. पण खात्री करून घेतली. आता उद्या मजा बघा - आपला संप उद्या मिटतो का नाही ते!ते जरा बावचळलेच. 

दुसऱ्या दिवशी अभाविपचे जिल्हा अध्यक्ष आले. अध्यक्ष म्हणजे काय - एक पीएचडचे विद्यार्थी होते. बरोबर डिग्रीचे काही विद्यार्थी. आल्या आल्या त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यांना आधी बाहेर हाकलत मी त्या अध्यक्ष्याना सांगितले, "यांना बाहेर ग्राउंडवर उभं राहायला सांगा - आपण बोलू."  मग जरा चहापाणी सांगून विचारलं,

"आता बोला - काय म्हणणं आहे तुमचं?" 

"मॅडम तुम्हाला तर माहितीच आहे - मुलांना अंतर्गतमध्ये कमी गुण मिळाले आहेत आणि त्यांच्या इतरही काही तक्रारी आहेत."

"ठीक. आधी गुणांबद्दल बोलू. तुम्हाला कल्पना असेल की एकदा रिझल्ट लागला की  गुणपत्रिकेत फेरफार करता येत नाही.

"हो मॅडम, त्याची मला कल्पना आहे. पण इथे अन्याय झाला आहे."

"ठीक - तुम्ही रिझल्ट पहिला आहे का?"

"म्हणजे अगदी नाही - पण मुलं काही खोटं सांगतील असं वाटत नाही."

मग मी रिझल्ट त्याला दिला आणि म्हणाले,

"नीट बघा - मग आपण बोलू.त्याने तो एकदा-दोनदा बघितला आणि मग माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागला. मग मी म्हणाले

"तुमच्या मते - कमी म्हणजे किती गुण?"

"४० / ४५ %?"

"आमचं पासिंगच ५०% चं आहे - म्हणजे तो प्रश्न मिटला. आता चांगले म्हणजे किती गुण?"

"६० - ६५ % ...

"ही यादी तुम्हीच बघा - आणि सांगा ६५%पेक्षा कमी किती आहेत?"

"...कोणी दिसत नाही खरं..."

"बरं - असे किती जण आहेत ज्यांना लिखित चांगले पण अंतर्गतमध्ये कमी गुण मिळाले आहेत?"

आता तो जरा गडबडला - म्हणाला, “मी एकदोघांना बोलावू का? - मी परवानगी दिल्यावर एकदोघे आले - मग त्या सगळ्यांनी मिळून यादी एकदा मग परत बघितली. मग मी त्यांना विचारले

"आता सांगा - तुमचा हा संप किती सयुक्तिक आहे?" तो उठलामला नमस्कार करत म्हणाला, "मी येतो मॅडम. जरा बोलतो या मुलांशी."  मुलांना घेऊन बाहेर गेला. 


थोड्या  वेळाने जोशी सर आत आले व म्हणाले, "मॅडमते अध्यक्ष तर गेले. तुमचं काय बोलणं झालं?" मी त्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना एका वर्गात यायला सांगितले. सर्व जमल्यावर मुलांना म्हटले, "कोणतीही नोटीस न देता तुम्ही हा संप  केलात. विद्यापीठाचा  गुणपत्रिकेत रिझल्टनंतर बदल न करण्याचा नियम लक्षात घेतला नाहीत. आणि मुख्य म्हणजे या अनाठायी संपामुळे तुमचे स्वतःचे किती नुकसान होऊ शकते हेही लक्षात घेतले नाहीतमी एक टीसीवर शेरा मारला तर कुठे परत प्रवेश मिळेल का याचाही  विचार केला नाहीत?  गेले काही दिवस वर्गात गैरहजर राहता आहात - त्याचे काय? संपामुळे ती काही क्षमापित होणार नाही. वर्ष वाया गेले तर काय सांगाल घरीतुम्ही शिक्षकांवर आरोप केले आहेत. ते तुमच्याशी कसे वागतील हे काही मी सांगू शकणार नाही - पण तुम्हाला पदवी घ्यायची असेल तर सत्र ताण तणावात घालवायचे का सुरळीत - ते तुम्हालाच ठरवावे लागेल. संप लांबला तर तणाव वाढणार हे नक्की."


मुलांमधे चुळबुळ चालू झाली. एक जण म्हणाला - "मॅडम, काही तरी करा. निदान आमच्या उपस्थितीचे तरी.मी म्हटले, " मी प्रयत्न करेन. पण संप मागे घेतो आहोत असा माफीनामा  लेखी लिहून द्या - सगळ्यांच्या सह्या त्यावर असू द्यात.थोडी चर्चा झाली - पण शहाणपणाने मात  केली - त्यांनी माफीनामा लिहून दिला. त्याच दिवशी मग मी एक पत्र आणि माफीनामा घेऊन एका शिक्षकांना जिल्ह्याच्या गावी पाठवले. संचालकांना फोन करून धर्माबादचा संप संपतो आहे याची माहिती दिली आणि गैरहजेरी क्षमापित करण्याची विनंती केली - त्यांनीही ती लगोलग मान्य केली. 


इतर ठिकाणचे संप जरा लांबले - पण धर्माबादचा लगेच मिटला. काही अनुचित प्रकारही  घडले. पुण्यात  झालेल्या बैठकीत नांदेडच्या संचालकांनी माझे यथोचित कौतुक केले. एक महिला अधिकारी असूनही कोणताही अनुचित प्रकार न होऊ देता संप मागे घ्यायला लावल्याबद्दल तारीफ झाली. झाले ते फक्त शाब्दिक कौतुकच. पण नोकरी सरकारी - तेव्हा हेही नसे थोडके!!


श्रद्धा कुलकर्णी





1 comment:

  1. सुंदर अनुभव आणि वेगळाच म्हणून भावला !

    ReplyDelete