अहो, ऐकलत का!

कट्टा संपादकीय समितीला खालील मदत हवी आहे.
* कट्ट्याची तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी उत्साही volunteer हवा आहे. स्वत:चा कम्प्युटर न घाबरता वापरायची तयारी. भरभक्कम आणि reliable internet कनेक्शन, गुगल,  वर्डचे प्राथमिक ज्ञान, आणि चुका केल्यावर दुरुस्त करण्याची मानसिकता – एवढे पुष्कळ आहे. बाकी आम्ही शिकवू. भेटा अथवा लिहा : mitramandalkatta@gmail.com

* कट्टा संपादकीय मंडळ मराठी लेखकांच्या शोधात आहे. तुम्ही – कथा, कविता, कादंबऱ्या, लेख, परीक्षणे, चुटकुले, चारोळ्या, चित्रे,  फोटो, audio, video (स्वत: केलेल्या), पाककृती; काहीही  (शक्यतो मराठीत) लिहित असाल; तर आम्ही त्या रास्त दरात (म्ह. चकटफू) घेऊन प्रकाशित करण्यास उत्सुक आहोत. कृपया आमच्याशी संपर्क करा – आमचा पत्ता : mitramandalkatta@gmail.com

* कट्टा संपादकीय मंडळ मराठी वाचकांच्याही शोधात आहे. आम्ही केलेल्या प्रयोगांची कुणीतरी दखल घ्यावी अशी आमची अत्यंत तळमळीची ईच्छा असते. अंक प्रकाशित केल्यावर “आज कुणीतरी यावे; लेख वाचून जावे” अश्या मनस्थितीत आम्ही असतो. आमचा संशय असा आहे की तुम्ही वाचक येता; पण चोरून लाडू खाणाऱ्या मुलांसारखे कसलाही पुरावा मागे न ठेवता निघून जाता. कृपया एखादा लेख आवडला तर छान आहे म्हणा; लेखक मंडळी जरा धीरावतात. आवडला नाही किंवा फक्त बराच वाटला तर “शिव्याही द्या; पण मराठीत!”. आम्ही तुमच्या मतांची जरूर नोंद घेऊ!

* जानेवारीत आम्हाला “तिळगुळ आणि मैत्री” या विषयावर विशेषांक काढायचा आहे; तुम्हाला एखादा परिच्छेद लिहिता आला; तर आम्हाला पाठवा.  तसेच फेब्रुवारीत, संत Valentine यांच्या प्रकट दिनानिमित्त  “माझे पहिले प्रेम” या विषयावर  तुमच्याकडून काही गोड गुलाबी भाषेतलं चटकदार, खमंग, एखाद दोन परिच्छेद तरी लांब असं लिखाण आवडेल. विषय छान आहेत, सोपे आहेत, मनाच्या जवळचे आहेत. उचला ती लेखणी (सॉरी;  घ्या तो की बोर्ड समोर.  गुगल इनपुट मध्ये किंवा WhatsApp मराठीत टाईप करून) आणि आम्हाला पाठवा. आमचा पत्ता (केवळ तुमच्या सोयीसाठी) तोच आहे. mitramandalkatta@gmail.com

No comments:

Post a Comment