Tuesday, July 31, 2018

कट्टा - ऑगस्ट २०१८

Painting by Anirudhha Paranjpe


नमस्कार रसिकहो,
पाहता पाहता वर्ष संपत आलं. आपल्या सर्वांचा लाडका गणेशोत्सव तोंडावर आलाय. या संपादक समितीचा हा शेवटचा अंक. पुढील महिन्यात गणेशोत्सवात आपला वार्षिक अंक प्रसिद्ध होणार आहे त्याची तयारी जोरदार सुरू आहे. त्यामुळे या महिन्याचा अंक हा 'मिनी कट्टा' या फॉर्ममध्ये काढावा आणि अगदी निवडक काहीच लेख यात समाविष्ट करावेत असं आम्ही ठरवलं.  

हे वर्षभर कट्ट्याचा काम करीत असताना खूप वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेलं, रचलेलं वेगवेगळ्या प्रकारचा साहित्य वाचायला, अनुभवायला मिळालं. अनेक प्रकारे अनुभव संपन्न होता अालं. वर्षभराचे बाराही अंक प्रसिद्ध करताना संपादन समितीच्या प्रत्येकाने वेळ काढून आपलं काम अगदी मनापासून केलं. त्याचाच परिपाक म्हणजे बाराही अंकाबरोबर एक तारखेला अतिशय चांगल्या स्वरूपात प्रसिद्ध झाले. या सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडेच.

याबरोबरच मित्रमंडळ समिती आणि अध्यक्ष श्री नरेंद्र नंदे यांनी आम्हा सर्वांवर विश्वास टाकला आणि कधीही एकाही बाबतीत प्रश्न न विचारता संपादक मंडळाचे सर्व निर्णय मान्य करून सहकार्य केलं त्याबद्दलही मन:पूर्वक आभार.
कट्टा परंपरा अशीच पुढे चालू राहणार आहे. त्यात आपणा सर्वांचे सहकार्य लाभेलच. 

आपणा सर्वांच्या आशीर्वादाने हा या वर्षातला बारावा अंक श्रीचरणी समर्पीत!

आपले नम्र, 
गंधाली सेवक व संपादक मंडळ