आंबोळी |
साहित्य : तांदूळ -- ३ वाट्या
तूरडाळ -- १ वाटी
हरभरा डाळ -- १ वाटी
उडीद डाळ --१ वाटी
ज्वारी -- १ वाटी
गहू --१/२ वाटी
धणे -- १/२ वाटी
मेथ्या -- ३ चमचे
हे वरील सर्व साहित्य एकत्र करून भाकरीच्या पिठा प्रमाणे सरसरीत दळून आणणे.
इडली पीठ(batter) --१ वाटी
लसूण -- ८/१० पाकळ्या
मिरच्या -- ३/४
कोथिंबीर -- ४ काड्या( लसूण,मिरच्या कोथिंबीर बारीक वाटून पीठा मध्ये घालणे)
तेल -- २ चमचे ( पीठात घालायला)
१/२ वाटी तेल वरून घालायला.
मीठ -- चवीप्रमाणे
हळद --१/२ चमचा
हिंग -- चिमूटभर
पाणी पीठ कालवायला
कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करून त्यात पाणी घालून पीठ सरसरीत भिजवून घ्यावे. बीडाचा
तवा चांगला तापवून मध्यम आच करून त्यावर एक चमचा तेल घालून पळीने आंबोळी घालावी. वरून
परत एक चमचा तेल सोडावे. वर झाकण घालून २ ते ३ मिनीटांनी आंबोळी परतवून परत दोन मिनिटं
ती तव्यावर ठेवावी. गरम गरम आंबोळी सोबत लोण्याचा गोळा, नारळाच्या चटणी सोबत / टोमॅटोच्या चटणीसोबत
आवडत असल्यास गोड लिंबू लोणचे चवीला देऊन खायला द्यावे.
सौ. श्वेता अनुप साठ्ये
No comments:
Post a Comment