कृष्ण भजन


भजन ऐकण्यासाठी नावावर क्लिक करा.  


घरोघरी करोकरी गीता जाऊ दे!
अभ्यासे सगळ्यांशी माधव बोलू दे ! Il धृ ll

कर्म न टळते कधी कुणाला 
या कर्माचा का कंटाळा ?
उद्योगे मनुजाला विकार जिंकू दे ! llll

मरणाचे भय का वाटावे ?
तनी मनाने का गुंतावे ?
'अनादि मी - अनंत मी ' ऐसे वाटू दे ! II२II

सत्य मधुर वच वदता यावे
तटस्थतेने बघता यावे
ध्येयाचा ध्यास जिवा सदैव लागू दे ! llll

जे जे पटले आचरीन मी
जे जे कळले ते शिकविन मी
कृष्णाशी समरसता अशीच साधू दे !  llll

गीता कळते गाता गाता
गीता कळते जीवन जगता
संस्कारे मज माझा स्वभाव बदलू दे ! llll

जे ज्याचे त्या करता अर्पण
अर्जुन बनतो स्वतःच मोहन
या देही या जन्मी स्वराज्य लाभू दे ! llll



 -कवी - कै. श्रीराम बाळकृष्ण आठवले

*******************************************************************************

तुझ्या मुखी भगवंताचे नाव असू दे. हातात कर्तव्याचा दीप घेऊन वाटचाल करत राहा. कृष्णच कर्ता हे अनुभवाने पटेल. नामस्मरणाने चित्त सहजच शुद्ध होऊन जाईल. मनानेच मनाला शिकवत जायचे. श्रीहरीच्या भक्ताला कसली आली आहे चिंता


कृष्ण, कृष्णम्हण येता जाता 
कळेल गीता गाता गाता ! ध्रु.

कर्तव्याचा दीप घे करी 
राम कृष्ण हरीवदो वैखरी 
अभ्यासा नित बसता बसता ! १ 

मी माझेहे सहज जातसे 
तू नि तुझेहे स्फुरण होतसे 
कृष्णच कर्ता, कृष्ण करविता ! २ 

जे तत्त्वी ते ये व्यवहारी 
प्रसन्न होता श्री गिरिधारी 
पार्थ नि माधव एक तत्त्वत: ! ३ 

चित्त शुद्ध हो नाम स्मरता 
हरिभक्तांना कसली चिंता
यज्ञ स्वरूप जीवन होता ! ४ 

मने मनाला शिकवित जावे 
मन:शांतिचे सुख सेवावे 
हृदयी श्रीगुरु हे जाणवता ! ५ 

- श्रीराम बाळकृष्ण आठवले 
(गीता कळते गाता गाता)


भजन ऐकण्यासाठी वरील नावावर क्लिक करा  




खालील भगिनींनी  हे भजन गायले आहे.
सौ.स्मिता देवधर, सौ.अनुराधा कुलकर्णी, सौ. वंदना कुंभार, सौ. श्रद्धा कुलकर्णी, सौ. अनाली देशपांडे, सौ. दीपाली जोशी, सौ. नंदिनी जोशी, सौ. तन्वी गद्रे, डॉ. सौ. संध्या कुलकर्णी, सौ. कुलकर्णी  

No comments:

Post a Comment