पांडुरंग पांडुरंग,
करिता झाला असा दंग….
उभ्या आयुष्याला मिळाला,
वारीचा रे रंग….
पांडुरंग पांडुरंग,
करिता स्मरण….
काय करिल,
जन्म मरण….
पांडुरंग पांडुरंग,
उभा विटेवरी….
चार ही मुक्ति,
तुझ्या चरणावरी….
पांडुरंग पांडुरंग,
आवडे प्रेमभाव….
तेथे राही जेथे,
भक्तिचा ठाव….
पांडुरंग पांडुरंग,
काय उणे तुझ्या ठाई….
तुचि असे ह्या,
पांडुरंग पांडुरंग,
पांडुरंग पांडुरंग….
तुझ्या नामात,
झाला रे अभंग….
प्राजक्ता पाठक
No comments:
Post a Comment