शब्द सुरांच्या जगात... अलवार....





अलवार..........
राधा आणि कृष्ण... एक मोरपिशी, अलवार नातं... स्त्री प्रेमाचं सर्वात मृदू, सर्वाधिक समर्पित, उत्कट, बेभान रूप... तितकंच आत्ममग्न आणि स्वच्छंद... म्हणजेच राधा. कृष्णाच्या बासरीसारखं तिचं अस्तित्व... त्याच्या स्पर्शावर, श्वासावर तिच्या जगण्याची सुरावट तोललेली... आणि अनेकानेक रंगछटांनी झळाळून उठलेलं त्या दोघांचं नातं. राधेच्या या रूपाचा मोह कवींना पडला नाही तरच नवल...

या दोघांच्या भेटीच्या क्षणावर एक सुरेख कविता आहे... माझी मैत्रीण आणि आजची आघाडीची कवयित्री... पूजा भडांगे हिची. राधेच्या कृष्णवेडाला तिने "सावळबाधा" म्हटलं आहे. मूळ कविता मोठी आहे आणि प्रसंगनिष्ठही आहे... मात्र ओळीओळीतून कृष्णाचं रूप आणि त्याची राधेला पडत राहिलेली भूल सुंदर रीतीने उलगडत नेणारी आहे. या कवितेचं मी गाणं केलं आहे... ते करत असतांना माझं मन घुटमळत राहिलं या ओळींपाशी...
"मज झाली सावळबाधा, मी झाले ना रे राधा..."

मी झाले ना रे राधा? म्हणजे प्रेमाचा जादुई स्पर्श कुठल्याही मुलीचं राधेच्या रूपांत, रुपांतर करू शकतो...  आणि मग माझ्या मनातलं गीत हे  प्रसंगनिष्ठ कडव्यांना वळसा घालून पुढे गेलं... आणि गाण्यात उमटली राधेची निखळ प्रेमभावना... "सावळबाधा". 

लिंकवरच्या व्हिडीओ मध्ये सर्व कडवी दिली आहेत. तरी सर्वांनी गाण्याबरोबर पूर्ण कवितेचाही आस्वाद घ्या...  

गाण्याची लिंक, क्लिक करा  -   अलवार...


प्रवरा संदीप 


No comments:

Post a Comment