Artificial Intelligence



"नक्की काय झालंय? एवढी चिडचिड का चाललीये तुझी?"

"हेच मी म्हणतेय. आधी अश्याच वेळी 'एवढी सेन्सिटिव्ह का झालीयेस', असं काळजीच्या सुरात विचारायचास. तू एकटा दिल्लीला मूव्ह झाल्यापासून जरा वेगळा वागतोयस. आणि मला माहीत होतं की असं होणार."

"अगं काय होणार? मला समजेल असं बोल जरा."

"काय बोलणार? तुला माहितीये? परवा मी मायबुकवर एक आर्टिकल वाचत होते. Distance is the top reason for divorce. ७१ टक्के जोडपी, जी कामानिमित्त वेगळी राहतात, त्यांच्यात घटस्फोट होतो."

"आता जरा अति होतंय हं तुझं. It's irritating!!!”

"पाहिलंस? आता तुला मी, माझं बोलणं सहन होत नाहीये. गेल्या आठवड्यात असेच दोन लेख आले होते मायबुकवर. How to sail through distant relationship. त्यात लिहीलेलं की..."

"एक मिनिट. तू हे असले लेख का वाचतेयस?"

"का म्हणजे? मायबुकवर येतायत वरचेवर. मी नाही जात शोधायला."

दोन मिनिटं डोळे बंद करून, काहीतरी आठवायला लागला तो. आणि मग मधेच "Oh God!!!" म्हणून डोकं धरून बसला. परत एका मिनिटानं ओरडला, "श्रेया, हे सगळं खूप डेंजरस आहे."

"आता मी काय कानडीत बोलत होते इतका वेळ? तेच तर वाचतेय मी सध्या."

"You are not getting it. मी एका महिन्याआधी मायबुकवर city change केली, बरोबर?"

"हो. मग?"

"तू अजूनही इथे मुंबईलाच आहेस. आणि मायबुकवर आपण नवरा-बायको आहोत असं जाहीरच आहे?"

"प्रशांत, अरे काय नवीन माहिती दिल्यासारखं सांगतोयस?"

"श्रेया, Artificial Intelligence बद्दल ऐकलंयस ना? आपला personal data, status updates वापरुन आपल्याला त्याप्रमाणे मायबुक feeds दिल्या जातायत. Artificial Intelligence वापरून आता आपल्या भावना, भीती, असुरक्षितताही कंट्रोल केल्या जात आहेत. This is freaking dangerous. मी आजच हा account delete करतोय. आणि तूही केलास तर बरं होईल."

Source: Google

मी सुन्न होऊन सगळं ऐकत होते. प्रशांतचा शब्द न् शब्द पटत होता. खरंच, तो तिथे गेल्यापासून असे लेख जास्त वाचनात येत होते. हे सगळं भयानक होतं. त्या दिवशी तो account delete केला आणि त्याबरोबरच चिडचिड, नात्यातली असुरक्षितता, भीती, सगळंच "delete" झालं.

मानस 

No comments:

Post a Comment