असा मी काय गुन्हा केला


ती दूर दूर गेलीमाझा गुन्हा कळेना
पहाटेस रात्र झालीअन् सावली मिळेना

लखदीप लावले मीरत्नांचिया महाली
जाळूनी श्वास माझे चेतावल्या मशाली
अंधार कोपऱ्यांतील तम मुळीही सरेना
पहाटेस रात्र झालीअन् सावली मिळेना

दिसली तुला न माझी आसवे वाळलेली
घालुनी घाव तूची कां न्यायधीश झाली?
केली क्षमा तरी कां मम याचना फळेना
ती दूर दूर गेलीमाझा गुन्हा कळेना

अरुण मनोहर

No comments:

Post a Comment