नाही हो गेले, सोडून मी
आहेच की साऱ्यांच्या मनांत,
सदैव या वास्तूच्या स्नेहात
स्नेहसख्यांच्या अखंड गोतावळ्यात...
नका होऊ दु:खी कष्टी,
हात माझा पाठी कार्यात
देतील साथ शब्द माझे
मानू नका ऋण कश्शात...
माझ्याच मनीच्या इच्छा जरि,
केली पूर्तता तुम्ही प्रत्यक्षात...
अशाच राहा हो कार्यरत
ही धुरा सांभाळा भविष्यात
स्वप्नांचा बांधून झुला,
उंच उंच घ्या झोका
आनंद घ्या क्षणाक्षणाचा
असेन मी असेन मी सदा तुमच्यात...!
सरोज घोरपडकर
No comments:
Post a Comment