४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मित्रमंडळ बंगलोर
येथे 'ज्योतिर्मय' भजनी मंडळाचा कार्यक्रम सादर झाला. सौ. ज्योती कुलकर्णी यांचे हे मंडळ
आहे. हे भजनी मंडळ गेली १५ वर्षे अव्याहत सुरू आहे. या भजन मंडळात भक्तिगीते, अभंग, गौळण, गोंधळ, जोगवा, विडा इत्यादी प्रकार म्हटले/शिकविले जातात.
या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे ही सगळी भजने गात असताना, त्यातील शब्द, त्याचे अर्थ, त्यातील भाव याला खूप महत्त्व असते. ती
भजने सुरेल असतात आणि त्यामुळेच ती श्रवणीय होतात. या कार्यक्रमात ज्योतीताई स्वतः पेटी
वाजवून भजने म्हणतात.
मित्रमंडळात सादर झालेल्या कार्यक्रमात श्री. नागराज
यांनी तबला संगतही उत्तम केल्याने कार्यक्रम खूपच रंगला. गात असताना भगिनी स्वतःच टाळही वाजवतात, त्यामुळे कार्यक्रमाला रंगत येते.
हा कार्यक्रम श्री गणरायाच्या समोरच
सादर झाला त्यामुळे छान वातावरण निर्मिती झाली.
श्री गणरायांची सेवा करण्याची संधी मित्रमंडळाने
आम्हाला दिली त्याबद्दल ' ज्योतिर्मय' भजनी मंडळ खूप आभारी आहे.
ज्योतिर्मय भजन कार्यक्रम लिंक: भजन
No comments:
Post a Comment