भरारी

 


चल घे भरारी आता

पुरे झाल्या भयकथा

 

कोण कुठला विषाणू

भासे यमदूत जणू

 

शिकवाया मानवधर्म आला

जगती हाहाकार झाला

 

जात धर्म न पुसे कोणा

धनी-निर्धन फरक करेना

 

करील जो नियमांचे उल्लंघन

त्यासी होई संक्रमण

 

ओस पडले रस्ते-बाजार

बंद झाले व्यापार

 

सार्या जगतात एकच भावना

मृत्यूच्या नाना कल्पना

 

जीवनचक्र वाटे थांबलेले

अदृश्य शत्रूला घाबरलेले

 

घरच्या अन्नाचे अन व्यायामाचे

महत्व सर्वांना पटलेले

 

आता मात्र पुरे झाले घरात बसणे

पुरे झाले लपून रहाणे

 

याने न होणार काहीच उपाय

घराबाहेर पडू द्या पाय

 

दाखवूया शक्ती मानवाची

मनाची, निर्धाराची आणि शिस्तीची

 

उघडा बंद दरवाजे

स्वागत करा नव्या जगाचे

 

ठरवा एकदा मनाशी

शपथ घेऊन स्वत:शी

 

राखेमधल्या फिनिक्सा परी

                                        घ्या तुम्ही उत्तुंग भरारी 


 मानसी नाईक             

             


No comments:

Post a Comment