***** भाऊबीज *****














आकाशकंदील: रुपाली गोखले 


येता जवळ दिवाळी

ओढ लागे माहेरची

कधी भेटेल रे भाऊ

आस लागते भेटीची

नाते बहीण भावाचे

किती अतूट अतूट

भाऊबीज येता ताई

धरे माहेराची वाट





आली भाऊबीज आज

पाटाभोवती रांगोळी 

सण दिवाळी दिवाळी 

भावा बहीण ओवाळी

 ताट आरती ठेऊन

मनोभावे ओवाळते

लाभो आयुष्य भावाला

देवा मागणी मागते

नाही आशा भाऊराया

नको मज ओवाळणी

तुझ्या मायेचा आधार

सदा राहो माझ्या मनी


शांती नांदो तुझ्या घरी

यावे वाटेल माहेरी

दोघे सुखात रे राहू

आपापल्या रे संसारी


आई बापाच्या रे मागे 

तूच पाठीराखा माझा 

सुखी आनंदात राहो 

सदा भाऊराया माझा





युवराज जगताप





 


No comments:

Post a Comment