आकाशकंदील: रुपाली गोखले
लहान बहिण भावाची जोडी
काढतात एकमेकांची खोडी
कुठल्याही नात्यात नसते अशी ओढ
म्हणून तर भावाबहिणीचे नाते गोड
बालपण सरे भराभरा
बहिण जाय सासरा
वाट पाहे भाऊराया
येता दिवाळी सण मोठा
नाही आनंदाला तोटा
भाऊबीजेची तर मजाच न्यारी
येता बहिण खुष होई भावाची स्वारी
भाऊबीज म्हणजे भावाबहिणीची अतूट माया
प्रेम, आपुलकी हा त्याचा पाया
जपावे निरंतर या नात्यास निर्मळ मनाने
जैसे जपले मुक्ताई व ज्ञानेशाने.
सौ.
स्वाती पाठक
No comments:
Post a Comment