भावपूर्ण श्रद्धांजली



पद्माताई साठे! बंगलोरकरांना हे नाव नवे नाही. 'त्या गेल्या' अशी बातमी आली आणि सगळ्यांना विलक्षण दुखः झाले. 'स्नेहधारा' ही महिलांची संस्था हे त्यांचेच अपत्य म्हणा ना!
माझा आणि त्यांचा परिचय १९९९-२००० च्या सुमारास झाला. त्यांनी एक 'स्नेहाक्षरे' म्हणून पुस्तक भिशी सुरु केली होती. आणि 'स्नेहधारा' ही संस्था तर गेली ४० वर्षे महालक्ष्मी लेआऊट  भागात कार्यरत आहे. ह्या दोन्ही गटांत मी एक दोन वर्षे जात होते. पण जेव्हा ह्या activity मला इंदिरानगर भागात सुरु कराव्याशा वाटल्या तेव्हा पद्माताईंनी मला सगळी मदत केली. माहिती दिली.

आमच्या 'संवादिनी' पुस्तक भिशीला एक वर्ष पूर्ण झाल्यावर त्या आणि स्नेहाक्षरेमधील अनेक मैत्रिणी आल्या होत्या. तसेच 'विविधा'च्या पहिल्या वर्धापनदिनीही स्नेहधारातील अनेक सख्या आल्या होत्या. त्यांचे आशीर्वाद आणि प्रोत्साहन सतत आम्हांला लाभले.
त्यांचे कार्य फक्त इतकेच नाही. त्या अनेक गोष्टीत निपुण होत्या. 
एक कर्तव्य कठोर पण तितक्याच प्रेमळ शिक्षिका, भरतकाम, चित्रकला, स्वयंपाक, लेखन, वाचन अशा अनेक गोष्टी सहजपणे त्या करायच्या आणि ते ही उत्कृत्ष्टरीत्या!
त्यांचा मला जेवढा सहवास लाभला तो माझ्या मानसिक, बौद्धिक वाढीत भर घालणारा ठरला. 
त्यांच्या हातून किती चांगल्या कामांना मदत झाली असेल गणतीच नाही.
विविधा, कट्टा टीम आणि संवादिनी पुस्तक भिशितर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


स्नेहा केतकर 

No comments:

Post a Comment