पुलं कधीच न पुसली जाणारी एक चिरंतन आठवण,
पुलं म्हणजे एक पर्व,
पुलं आम्हा मराठी जनांचा गर्व ॥ १ ॥
पुलं म्हणजे एक पर्व,
पुलं आम्हा मराठी जनांचा गर्व ॥ १ ॥
पुलंची एक-एक अजरामर कलाकृती,
त्यांच्या साहित्यातून डोकावते आपली मराठमोळी संस्कृती,
पुलं म्हणजे जणू साहित्यातील अथांग सिंधू,
पुलं आम्हा मराठी जनांचा मानबिंदू ॥ २ ॥

विविध नमुने जे दिसती आपणां दारोदारी गल्लोगल्ली,
त्यातूनच जन्माला आल्या पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली,
पुलंच्या वल्लींच्या आपण तपशीलात जातो जेव्हा,
वाटते त्यांच्या तरल निरीक्षणशक्तीचा वाटेल शेरलॉक होम्सलाही हेवा ॥ ३ ॥

फार फार पुढे जाण्याची लागली आहे आपणां सर्वांनाच घाई,
तरी वेगाला कावलेला ‘असा मी असामी’ आहे प्रत्येकाच्या ठायी,
‘टाईम्स हॅव चेंजड्’ म्हटले तरी संस्कार काही बदलत नाही,
सर्व सुखसोयीसंपन्न फ्लॅटमधला देव आपण हलवत नाही ॥ ४ ॥

बटाट्याच्या चाळीतल्यांनादेखील पुलंनी दाखवली
अपूर्वाई-पूर्वरंग,
इतिहासात शिरून दाखवली सर्वांना कान्होजी आंग्रेंची जंग,
तुम्हाआम्हाला घेऊन पुलंनी काढली वार्यावरची वरात,
धनदौलत त्यांच्यासाठी क्षुल्लक त्यांना मिळाली निरागस हास्यांची खैरात ॥ ५ ॥

आभाळापलिकडल्या या महात्म्याचे होते जमिनीवर पाय,
गोरगरीबांवर पांघरली त्यांनी नेहमीच मायेची साय,
पैसाअडक्याचा मोह नव्हता कधीच, केला सत्पात्री दानधर्म,
माणुसकी हा त्यांचा धर्म व लोकांना हसवणे हे एकच कर्म ॥ ६ ॥

असेच महात्मे धरतीवर धाडत जा परमेश्वरा,
तुझे आजन्म राहू आम्ही ऋणी,
आमचे आयुष्य सुखकर करतात,
तुझी हीच नक्षत्रांची देणी ॥ ७ ॥
तुझे आजन्म राहू आम्ही ऋणी,
आमचे आयुष्य सुखकर करतात,
तुझी हीच नक्षत्रांची देणी ॥ ७ ॥
-- मोहित केळकर
No comments:
Post a Comment