वेळेची एक गम्मतच आहे बघा.
खूप निसरडी असते, धरून ठेवता येत नाही
कोणासाठी थांबत नाही, कोणाकडे रहात नाही
तिच्या बरोबर सहज बोट धरून चालता पण येत नाही
मौल्यवान असते, पण साठवून ठेवता येत नाही
वाट पहाणे तिला जमत नाही
निघून गेली तर परत येत नाही
कोणालाही विचारा "तुमच्या कडे आहे का?"
तर "नाही" असेच उत्तर येईल.
उसनी देता येत नाही, उसनी घेता येत नाही
ती असते सतत आपल्या आसपासच
सावधपणे निरखली तर दिसते
पण पराकाष्ठेनी साधावी लागते.
काळाशी जोडलेली असून देखील
आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून असते
काळा बरोबर नेहमी समांतर चालते
दोघे जोडीने येतात कधी कधी,
तिथे मात्र ती काळाशी एकरूप होते.
ती वेळ................ मग वेळ रहात नाही,
"अवेळ" होते.
No comments:
Post a Comment