हा तीन ओळींचा मूळचा जपानी काव्यप्रकार-निसर्गाशी जवळीक साधणारा,
मनाला भिडणारा. यात पहिल्या व तिसऱ्या किंवा दुसऱ्या व तिसऱ्या ओळीत
यमक साधलेले असते.
मराठी मातीत 'हायकू' हा काव्यप्रकार शिरीष पै यांनी रुजवला. त्यांनी स्वतःचे
हायकू तर रचलेच पण जपानी हायकूकारांच्या इंग्रजीत अनुवादित झालेल्या
हायकूंचेही मराठीत भाषांतर केले.
मला सुचलेले काही हायकू -
सुंदर फुले उमलली
ईश्वर चरणी अर्पिली
सागरी लाटा
सोनेरी किरणांनी नाहती
जीव वेडावती
गंधाविना वेडी
देखणी अबोली
मंथन करी
राधा कृष्णवेडी
कंकण नाद करी
याचक वृद्ध थकलेला
मोहरली आमराई
साद कोकिळे
आस तप्त ग्रीष्माची
फुल जास्वंदीचे
No comments:
Post a Comment