शब्द सुरांच्या जगात - पाऊस


पाऊस... सगळ्यांनाच आवडतो... लहानांपासून मोठयांपर्यंत सगळ्यांना. कविता, गाणी  तरी किती त्या पावसावर !...

ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा... हे गाणं ऐकलं की आपण लहान होऊन त्या मोठ्या पावसात भिजतो, होड्या सोडतो... तर कधी... श्रावणात घननिळा बरसला... म्हणत रिमझिम रेशीम धारांमध्ये चिंब होतो.

तुम्ही म्हणाल मधेच कुठे ही पावसाबद्दल बोलायला लागली !... आत्ता काय पावसाळा आहे का? पण  नाही... अवेळीही येतो की तो... फार दिवसांनी अचानक न सांगता, न ठरवता जिवाभावाचा मित्र भेटायला येतो आणि भावभावनांचा सुंदरसा मृदगंध दरवळतो ना, अगदी तसंच होतं तेंव्हा. पण कुणाचा पाऊस कुठला !... हे आपण कसं सांगणार !... भावभावनांच्या सरी आपल्या अंगावरून नुसत्याच वाहून जातात की आपण त्यात नखशिखांत भिजतो हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. असं म्हणतात की, "Some people feel the rain and others just get wet"... पण हे सगळे पाऊस डोळ्यात दाटून येतात आणि मग त्याचं गाणं होतं.

असाच पाऊस मला भेटला... सतीश देवपूरकर यांच्या एका कवितेत... आणि शब्दांबरोबर सुरांच्या हलक्या हलक्या रेशीम सरी मनाला भिजवत राहिल्या... आणि डोळ्यात दाटून आलेला पाऊस सुरांमधून भुरभुरला....
खालील लिंकवर जरूर ऐका...
गीत - डोळ्यात दाटलेला पाऊस
शब्द - सतीश देवपूरकर
संगीत - प्रवरा संदीप
गायक - ओंकार संगोराम / श्रुती संगोराम
गिटार - नम्रता आणि चैतन्य
ऑडिओ बॅकड्रॉप / कॅमेरा / पोस्ट प्रॉडक्शन - शुभोदीप रॉय
निर्मिती - संदीप लिमये आणि ओंकार संगोराम


प्रवरा संदीप 

No comments:

Post a Comment