तिळगुळ आणि मैत्री - अंजली टोणगांवकर, आकुर्डी


तिळाचा स्नेह आणि गुळाची गोडी.
शब्द सुनीताला एकमेकांची आवडी !

तिळाला केलं गरम, मिक्सरमध्ये कुटलं
गुळाचा स्पर्श होताच, खुदकन हसलं

तीळ म्हणाले गुळाला – जरी तू गोड, तरी आहेस चिकटोबा,
गुळ म्हणतो – असेन मी चिकटोबा, पण तुझाच नवरोबा !

तीळ आहे स्नेहशील, आहे त्यात स्निग्धपणा,
पण, गुळाशिवाय तो खासच उणा’

तीळ आणि गुळ, तुम्ही भांडू नका रे,
पाक झाला तयार, नांदा सौख्यभरे’

तिळाची वाडी, तिळाचा लाडू अन तिळाची चिक्की
गुळाच्या संयोगाने मैत्री झाली पक्की

मग कोणी म्हणाले तिळगूळाला -
"तुमची सद्दी संक्रांतीपर्यंत, नंतर तुम्हाला विचारतेय कोण? "
तिळगुळ उत्तरले -
"मैत्रीची गाठ आम्ही पक्की बांधतो, आम्हाला विसरणार कोण!"

गुळाची ढेप, गणपती एवढी, तर तीळ त्याच्यापुढे मूषक,
सर्व मंगल करेलच, विघ्नहर्ता विनायक!


अंजली टोणगांवकर

No comments:

Post a Comment