केल्याने होत आहे रे !!!!!


खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, व्यायामाचीही विशेष आवड नसताना, श्री. आळसे यांनी अनेक क्रीडाप्रकारात मिळविलेले प्राविण्य पाहून स्तिमित व्हायला होते. कारणे देऊन व्यायाम टाळणाऱ्या सगळ्यांना ही मुलाखत प्रेरणा देईल.

२१ ऑक्टोरला झालेली बंगलोर मॅरेथॉन विश्वनाथ आळसे यांनी ४ तास २० मिनिटे आणि ५१ सेकंदात पूर्ण केली म्हणून समजले, तेव्हा आमच्या या धावणाऱ्या मित्राच्या या प्रवासाचा धावता आढावा घ्यायचे मी ठरवलेत्याप्रमाणे त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या.  

श्री. विश्वनाथ आळसे, वय वर्षे ५८, सध्या बंगलोर इथे Bosch (RBAI - Naganathapura) कंपनीमध्ये कार्यरत आहेत. या माणसाने आरोग्याचे महत्त्व पटल्यावर धावणे, सायकलिंग, स्वीमींग, ट्रेकिंग हे सगळे छंद ठरवून जोपासले आहेतहा कुणी लहानपणापासून क्रीडाक्षेत्रातला 'मेडलमिळवत स्पर्धेत उतरणारा खेळाडू नाही, तर तुमच्या आमच्याप्रमाणे दिनचर्या असलेलाच आहे, तरी पण अनुकरणीय वाटतो, कारण आरोग्याचे भान जागृत झाल्यावर त्यांचा निरोगी जीवनाचा आलेख उंचावत नेणारा आहेत्यांना लहानपणापासून आवड होती का किंवा हा छंद कसा लागला असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की लहानपण बैठे खेळ, वाचन, सिनेमा पाहणे यामध्येच गेले. सायकलसुद्धा शाळा-क्लासला जाणेयेणे इतकीच मर्यादित होती.

औरंगाबाद येथे B.E. करून नाशिकला Bosch कंपनी मध्ये रुजू झाल्यावर सगळे से मजेत चालले होते. मजेची व्याख्या बदलत चालली होती. म्हणजे दिवसाची सुरुवात स्मोकिंगने व्हायची अन् वीकएंड ड्रिंक्सने. हळूहळू हे प्रमाण वाढत चालले होते. समृद्धी येत असताना शरीरावर दिसत होती. वजनाचा काटा ६० किलोवरून ८६ किलोवर गेला होतापरिणामी BP चा त्रास सुरु झाला. स्ट्रेस टेस्ट पॉजिटीव्ह आली. काही दिवस हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावे लागले. हे घडले मार्च १९९७ मध्ये. चाळिशीच्या आतला हा सेटबॅक बरे शिकवून गेला. त्याच काळात वाचनात आलेल्या डॉ. अभय बंग यांच्या पुस्तकाने (माझा साक्षात्कारी हृदयरोग) जगण्याची दिशाच बदलली. कौटुंबिक जबाबदाऱ्या समोर दिसत होत्या... जीवनशैली बदलायची हे क्के ठरवले
     
श्री विश्वनाथ आळसे
निश्चय झाला, पण सुरुवात कशी आणि कुठून करायची? त्यासाठी कंपनीमधलेच त्या वेळेचे जर्मन अधिकारी (Mr. Florel) डोळ्यासमोर आदर्श होते. त्यांची दिनचर्या, energy level सगळे अवाक करणारे होते. त्यांनाच डोळ्यासमोर ठेऊन सुरुवातीला नाशिकच्या गोल्फ क्लब (सध्याचे अनंत कान्हेरे) मैदानावर चालणे सुरु केले. मैदानाचा ८०० मीटरचा राऊंड २००२ मध्ये तासात व्हायचे. मैदानावर एक झाले ते म्हणजे चांगला ग्रुप मिळाला. १८-२० जणांच्या या ग्रुपमध्ये डॉक्टर, इंजिनीअर, कामगार, व्यापारी इत्यादी निरनिराळ्या क्षेत्रांतली मंडळी, पण व्यायामाची आवड समान होती. नंतर जमेल से धावणे सुरु झाले. सुरुवातीला १०० मीटर पण कठीण वाटायचे. पण सातत्य आणि जिद्द, अन् ग्रुपचे प्रोत्साहन यामुळे २००७ मध्ये झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. या सगळ्यामुळे आत्मविश्वास वाढला आणि या ग्रुपचे कधी सायकलिंग, स्विमिंग, ट्रेकिंग असे उपक्रम सुरु झाले.

याच दरम्यान २००४ मध्ये आळसेंनी आळंदी -पंढरपूर वारी केली. त्या प्रवासातून एक वेगळाच अध्यात्मिक आनंद मिळाला असे ते सांगतात२००४ मध्ये जुन्या सवयी स्मोकिंग वगैरे पूर्णपणे बंद झाल्या, तसेच औषधी गोळ्याही बंद झाल्या२००९ मध्ये याच ग्रुपने सायकली खरेदी करून आठवड्यामध्ये १२/१५ किलोमीटर धावणे आणि ८० किलोमीटर सायकलिंग सुरु केले२०१२ मध्ये नाशिक ते पंढरपूर सायकलवारी केली२०१४ मध्ये ठाणे-पालघर १८० किलोमीटर रेसमध्ये नाशिक ग्रुपला दुसरा नंबर मिळाला.

आता जीवनशैली पूर्णपणे बदलली होती. ग्रुपमधले वाढदिवस सायकलिंग करून जात येईल असे स्पॉट निवडले जायचेवाढत्या ग्रूपमध्ये सौ. कांचनही सामील झाल्या. सायकलिंगचे वेड एवढे वाढले की त्यांनी स्वतःच्या पत्नीला आणि मुलीला वाढदिवस निमित्त सायकल भेट देऊन प्रोत्साहन दिले.

दरम्यान बेंगलोरला बदली झाल्यावर नवीन, अनोळखी ठिकाणी छंद जास्त जवळ आले. बेंगलोरमध्ये सायकलिंग खूप सुरु झाले. बेंगलोर ते तिरुपती सायकलवारी झाली.  पंढरपूर डोंगरावर वारी चालू होतीच. पण २०१६ मध्ये काही कारणास्तव जाता आले नाही, तर तामिळ मित्रांसोबत केरळमध्ये अयप्पा डोंगरावर जाणे झाले. पूर्णपणे ४० दिवस एकभुक्त राहून. तेव्हा आळसेंचा अनुभव असा की भाषा, द्धती वेगळ्या असल्यातरी अध्यात्मिक आनंद, त्या भावना या ही वारीत तोच होता.

बेंगलोरला रहायला आल्यावर सोसायटीमध्ये सकाळी उठून धावणाऱ्या या माणसाने हळूहळू बऱ्याच जणांना आकर्षून घेतलेअन् तिथेही १५-२० जणांचा ग्रुप झाला आहे. यामध्ये बरीचशी तरुण मुले आहेत. या "दौडनेवाले अंकलने" तिथेही बऱ्याच मैदानी अॅक्टिव्हिटीज सुरु केल्याया मे महिन्यामध्ये महिनाभर संध्याकाळी ते ११ वयोगटातील १२ मुलांना swimming शिकवलं ते ही छंद म्हणून विनामोबदला

आळसे कोणत्याही गावा असोत, सकाळी तिथल्या ग्राऊंडवर हमखास भेटणार! हा आदर्श त्यांनी स्वतः घालून दिला आहेयाचेच एक उदाहरण म्हणजे, नाशिकचा किशोर घुमरे बेंगलोरला आल्यावर त्यांना अडगुडी ते नागनाथपुरा धावत भेटायला गेला. हेच उदाहरण पुरेसे आहे!

नव्याने व्यायाम करणाऱ्यांसाठी काय सांगाल असे विचारल्यावर आळसे म्हणतात, आरोग्य ही जपण्याची गोष्ट आहे. त्यांच्यामते Health Provision महत्त्वाची आहे. आयुष्यातील तास रोज तुम्ही खर्च करा, परमेश्वर त्याचे Contribution नक्की देतो.

परवाच Bosch RBEI मध्ये त्यांचे व्याख्यान झाले. २५-३० जणांना प्रवृत्त केले. खूप भरभरून आणि कळकळीने सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. लोकांपर्यंत पोहोचून त्यांना आरोग्याविषयी जागरुक करायचे हा त्यांचा उपक्रम. यासाठी बेंगलोरवासियांना या माध्यमातून विश्वनाथ आळसेंची ओळख करून देणे हा मी माझा खारीचा वाटा समजते


उल्का कुलकर्णी
मो. ९९७०१८८०३८  

No comments:

Post a Comment