पुस्तक परीक्षण - ब्र



कविता महाजन यांचे अचानक निधन झाले आणि आमच्या पुस्तक भिशीत त्यांच्या पुस्तकांची चर्चा झाली. मी त्यांची पुस्तके वाचली नव्हती. तेव्हा एका मैत्रिणीने त्यांनी लिहिलेले 'ब्र' पुस्तक दिले आणि म्हणाली, 'बघ वाच तरी. सांग तुला काय वाटतं ते'.

नावावरूनच उत्सुकता वाटायला लागली होती. आधीच ते पुस्तक गाजलेले होते. मोठ्या उत्साहात वाचायला सुरुवात केली.आणि बघता बघता इतकी गुंतून गेले ना त्यात!!

नुकत्याच एका त्रासदायक लग्नातून घटस्फोट घेतलेली नायिका प्रफुल्ला. कोणताही कॉन्फिडन्स नसलेली एक साधीसुधी घरगुती बाई! चित्रकला शाखेची पदवीधर. नवऱ्याचा भरपूर छळ सहन करणारीप्रसंगी त्याचा मारही मुकाटपणे खाणारी. घटस्फोटानंतर आलेले रिकामपण सत्कारणी लावावे आणि मनही गुंतवावे म्हणून आपल्याच एका मित्राच्या प्रगत नावाच्या NGO मध्ये अत्यल्प मानधनावर काम करण्यास सुरुवात करते.

महाराष्ट्रातील ३७ जिल्हेत्यातील तालुके आणि त्यातील आदिवासी वस्त्यांमध्ये फिरून माहिती गोळा करणेपंचायत राज्य स्थापन झाल्यानंतर नेमणूक झालेल्या महिला सरपंच आणि त्यांचे अनुभव याविषयी या पुस्तकात चर्चा केली आहे. आडरानातदऱ्याखोऱ्यातदुर्गम भागात असलेल्या आदिवासी वस्त्या! तिथपर्यंत पोचून माहिती काढण्याचा प्रयत्न आणिस्वतःची स्वतः ला झालेली नव्याने ओळखअसा हा नायिकेचा प्रवास लेखिकेने अतिशय सुरेख वर्णन केला आहे. डोंगरदऱ्यातून फिरताना तेथील निसर्ग सौंदर्यरंगांची उधळण याविषयी वारंवार उल्लेख येतो आणि नायिका ही चित्रकला शाखेची पदवीधर आहे ही सतत जाणीव होत राहते.

नायिकेबरोबराच आपणही हा प्रवास करत आदिवासी वस्त्यांमध्ये जाऊन पोहोचतोतिथल्या लोकांची मनस्थिती समजून घेतोसरपंच महिलांचे तसेच गावातील इतरही problems समजून घेण्याचा प्रयत्न करतो. महिला सरपंच यांना मिळणारी वागणूकपुरुषांचे बायकांविरुद्धचे राजकारणआणि त्याला तोडीस तोड उत्तर देणाऱ्या मुकणे बाईंसारख्या खमक्या महिला सदस्य!! 

आपल्याला पुस्तक वाचताना सतत जाणवत राहते ते लेखिकेने केलेले सखोल संशोधन. Survey करताना विचारलेले प्रश्नत्यासाठी तोडगा काढण्यासाठी केलेले प्रयत्न यातून आपल्याला दिसते ती या समाजासाठी काहीतरी करायची प्रामाणिक तळमळ.

डॉ. दयाळत्यांची अमेरिकन पत्नी Angela यांसारखे निस्वार्थपणे काम करणारी मंडळी आपल्याला प्रकाश आणि मंदाकिनी आमटेअभय नि राणी बंगआणि कितीतरी मंडळी यांची आठवण करून देतात.

सगळीकडे प्रचंड घाणअस्वच्छतागलिच्छपणा दिसत असताना लेखिकेने वर्णन केलेल्या स्वच्छ आदिवासी वस्त्यांमध्ये आपण आनंदाने चक्कर मारून येतो. नायिकेला शहरा/ गावांपेक्षा आदिवासी खेड्यांमध्ये जी सुरक्षिततेची हमी असते ती सध्याच्या 'me too' या गदारोळात खूपच दिलासा देते.

फक्त या पुस्तकात येणाऱ्या अनेक आदिवासी वस्त्यांमधल्या महिला सरपंचत्यांचे अनुभवत्यांना येणाऱ्या अडचणी हे सर्व थोड्या फार फरकाने सारखेच आहे. फक्त पात्रांची गावांची नावं बदलेली आहेत असे वाटते. त्यामुळे हे पुस्तक थोडेसे monotonous झाल्यासारखे वाटते. पण तरीही पुस्तक एकूण अतिशय वाचनीय आहे याबद्दल काही वादच नाही!!

कविता महाजन या लेखिकेची मला तिच्या जाण्यानंतर का होईना पण ओळख झाली हे महत्त्वाचे आहे माझ्यासाठी.

मीनल टोणगावकर










No comments:

Post a Comment