तिळगुळ व मैत्री – डॉ. दिलीप कानडे, निगडी



आपल्या संस्कृती मध्ये काही भावनांना खाद्य पदार्थांशी जोडलेले आहे. तांदूळ (अक्षता) आणि निमंत्रण किंवा निरोप आणि विड्याचे पान ह्याचीच उदाहरणे आहेत. तिळगूळाला मैत्रीशी जोडणे पण अत्यंत समर्पक आहे. 

मैत्रीची पहिली पायरी आगंतुकाचे स्वागत असणार, म्हणून आपण त्यांस गूळपाणी देतो. मैत्री तिळा तिळाने वाढते. गूळ करण्याच्या प्रक्रियेत उसाच्या रसाला घट्ट केले जातें, मैत्रीही परस्पर संबंध आणि भावना गाढ झाल्याने घट्ट होते. 

गूळ करतांना मिश्रणावरची मळी काढावी लागते. मैत्रीतही गैरसमजाच्या मळाला थारा नसतो. पाण्यात गूळ विरघळतो, पण पाण्याला गोडवा देवून जातो. मैत्रीही काळाच्या ओघात धूसर झालीतरी आठवणींचा गोडवा कायम राहतो. 

तिळा तिळाने वाढलेली मैत्री तिळानेच कमी झाली तरी दातांत अडकलेल्या तिळा प्रमाणेच आठवणींच्या कप्यामधे कायम राहते.


दिलीप कानडे, प्राधिकरण, निगडी

No comments:

Post a Comment