श्री क्षेत्र
कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर:
अकराव्या शतकात निर्माण
झालेले, पूर्वाभिमुख
असलेले आणि संपूर्ण
काळ्या पाषाणात
बांधलेले हे शिवमंदिर
२६ मीटर लांब आणि २३ मीटर रुंद असून दीड मीटर उंचीच्या
जोत्यावर उभारले
आहे.
श्री क्षेत्र कर्णेश्वर
मंदिर, संगमेश्वर: अलकनंदा
आणि वरुणा या नद्यांच्या
संगमावर वसलेले
हे संगमेश्वर! संगमेश्वर
माहात्म्य नावाचा
एक प्राचीन ग्रंथ आहे. त्यात या मंदिराच्या
निर्मितीची कथा येते. चालुकी या धनुर्धारी
राजाला कर्ण, नाग, आणि सिंघण असे तीन पुत्र होते. यातील कर्णराजाने
कोल्हापूरचे महालक्ष्मी
मंदिर बांधणाऱ्या स्थपतींकडून
हे मंदिर बांधून
घेतले.
श्री क्षेत्र
कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर:
या मंदिराचे महत्वाचे
वैशिष्ट्य असे की त्याच्या
सभामंडपात असलेले
खांब त्या खांबावर
आडव्या असलेल्या
तुळया आणि त्या तुळया तोलून धरण्यासाठी
दाखवलेले यक्ष! खांब आणि तुळया जिथे एकमेकांना
काटकोनात टेकतात
त्या भागावर यक्षप्रतिमा
कोरलेल्या असतात, ते यक्ष जणू काही तुळयांचा भार स्वतःच्या खांद्यावर
तोलून धरत आहेत.
कर्णेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य असे की या ठिकाणी यक्षांच्या जागी काही देवता कोरलेल्या आहेत. गणपती, नृसिंह आणि सरस्वती यांच्या मूर्तीचे अंकन केलेले दिसते.
श्री क्षेत्र कर्णेश्वर
मंदिर, संगमेश्वर: या मंदिराचे
आणखी वैशिष्ट्य म्हणजे
याच्या मुखमंडपाच्या
छतावर केलेले अजोड नक्षीकाम!
मुखमंडपात मध्यभागी
वर्तुळाकृती घुमट कोरलेला
आहे. त्याचे दगडी झुंबर निव्वळ
देखणे असे आहे, त्याच्या
खाली अष्टदिक्पाल त्यांच्या
वाहनांवर बसलेले
दाखवले आहेत. दरवाजावर
शेषशायी विष्णू
असून त्याचेवरती दशावतारांचे
केलेले अंकन प्रेक्षणीय
आहे. मात्र इथे आठवा अवतार म्हणून
कृष्णाऐवजी बलराम दाखवलेला
दिसतो.
श्री क्षेत्र कर्णेश्वर
मंदिर, संगमेश्वर:
रामक्षेत्रात सहा विशेष श्रेष्ठ
अशी क्षेत्र सांगितली
आहेत. गोकर्ण, सप्तकोटीश,
कुणकेश, हरिहर आणि त्र्यंबकेश्वर
यामध्ये चौथे विशेष श्रेष्ठ
क्षेत्र संगमेश्वर
हे सांगितले आहे.
श्री क्षेत्र कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर: सन २०१२ मध्ये श्री कर्णेश्वर मंदिर पुरातत्व विभागाने "राज्य संरक्षित स्मारक" म्हणून जाहीर केले आहे.
श्री क्षेत्र
मूळजोगाई, अंबाजोगाई:
अंबाजोगाईच्या मंदिराजवळ
अजून एक छोटे मंदिर आहे ज्याचे
नाव “श्री क्षेत्र
मूळजोगाई” असे आहे. ज्या ठिकाणी
देवी मूळ
रुपात प्रकट
झाली ते
हे स्थान.
श्री क्षेत्र
मूळजोगाई, अंबाजोगाई:
चितळे भक्त
निवासापासून 1.5 km वर हे
मंदिर आहे.
देऊळ तसे छोटे आहे, पण तेथील मूर्ती
खूप छान आहे. अंबाजोगाईच्या दर्शनाला जाताना
या मूळजोगाई
देवीला अवश्य भेट देऊन मूळ स्वरूपातील
देवीचे दर्शन घ्यावे.
नरेन साठये
No comments:
Post a Comment