दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा हंसा वाडकर यांच्या "सांगते ऐका" या आत्मचरित्रावर आधारित असलेला पण पूर्णपणे
स्वतंत्र असा भूमिका हा चित्रपट आहे. श्याम बेनेगलांनी हा चित्रपट हिंदीत केला, ज्यामुळे तो भारतातील आणि आंतरराष्ट्रीय
पातळीवरील प्रेक्षकवर्गापर्यंत पोचला.
हंसा वाडकर या १९३० ते ४० च्या दशकातील
किंवा त्यापुढेही काही काळ चित्रपटसृष्टीत कार्यरत होत्या. हंसा
वाडकर
या त्यांच्या काळातील मान्यताप्राप्त व यशस्वी कलाकार होत्या. चित्रपट बघताना एक मान्यताप्राप्त स्त्री
कलाकार म्हणुन त्या दिसतातच,पण
त्यामागे त्या एक गृहिणीही आहेत हे ठळकपणाने जाणवते. घर असून गृहस्वामिनी नसलेली ही स्त्री. हा चित्रपट ह्या स्त्रीची नक्की “भूमिका” काय होती याचा विचार करायला लावणाराही
आहे.
उषा ही आईकडून देवदासी घराण्यातील आहे. तिच्या आईने एका ब्राह्मण कुटुंबातील
मुलाशी लग्न केले.
त्यामुळे समाजात या घराला कोणतेही स्थान
नाही.
उषाच्या या घरात उषा, आई, तिचे दारू पिणारे वडील आणि तिची आज्जी
असतात.
घरातील आर्थिक परिस्थिती अगदीच ओढगस्तीची
आहे. तिची आज्जी ही शास्त्रीय संगीत गायिका आहे. त्यामुळे उषालाही उपजतच चांगल्या आवाजाची
देणगी मिळालेली आहे.
घरात कोणीच कमावणारे नसल्याने तिच्या
आईची होणारी ओढाताण,
हात-तोंडाची मिळवणी करण्यासाठी तिचा होत असलेला
त्रागा,
व त्यातच एके दिवशी उषाच्या वडिलांचा
मृत्यू होतो.
कुटुंबातील लांबचा नातेवाईक असलेला केशव, उषाला चित्रपटात काम करण्याविषयी सुचवतो.
केशव छोट्या उषाला घेऊन मुंबई महानगरीत
येतो.
छोट्या गावातून आलेली उषा काहीशी भांबावलेली
असते.
परंतु अंगभूत गुणांमुळे तिला चित्रपटात
प्रवेश मिळतो.
नुसताच प्रवेश मिळत नाही, तर प्रमुख भूमिका असलेले चित्रपटही तिला
मिळु लागतात.
याचवेळी तिच्या नकळत तिच्यापेक्षा वयाने
बराच मोठ्या असलेल्या
केशवच्या प्रेमात व नंतर लग्नबंधनात ती अडकते. तिची मनापासूनची इच्छा आपण स्वतः एक उत्तम गृहिणी असावे
अशी असते.
पण पैसे कमविण्यासाठी काहीही न करणाऱ्या
केशवला मात्र उषा एक उपजीविकेचे साधन वाटत असते.
लग्नाच्या पहिल्याच रात्री यापुढेही तिला चित्रपटात काम करावे लागणार आहे याची जाणीव
होते. एवढेच नव्हे, तर चित्रपटात नायक कोण असावा, कोणत्या दिग्दर्शकाकडे तिने काम करावे
हे सर्व केशवच ठरवेल हे ही समजते. लग्नापूर्वीच तिच्या पोटात बाळ वाढत असते. नाईलाजाने तिला परत चित्रपटाकडे यावे
लागते.
एकीकडे ती या झगमगीत दुनियेत काम करते, तर उंबऱ्याच्या आत आली की, एका गृहिणीची भूमिका उत्तमरित्या सांभाळणारी
उषा बनते.
दोन्हीही
भूमिकाच!!!!!
दिवसेंदिवस केशवचे वागणे तिला त्रासदायक
होत असते.
उषा ही रूढ अर्थाने बंडखोर नाही. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात चित्रपटात
काम करणे हा ही खरंतर बंडखोरपणाच होता. तिच्या
चित्रपटात नायक असलेला राजन मात्र तिच्या प्रेमापोटी लग्न करत नाही. केशवबरोबर वाद झाल्यानंतर हक्काचे घर हे तिला राजनचेच वाटते. पण केशवाला सोडून राजनशी लग्न करण्याची
तिची तयारी नसते.
तिच्यावर अवलंबून असलेली आई आणि मुलगी, यांच्या अदृश्य बेड्या तिला हे करू देत
नाहीत.
पुढे तिला होणारे मूल हे आपले नाही, या कारणाने केशव तिला गर्भपात करायला
भाग पाडतो.
उषाला याचा प्रचंड मानसिक धक्का बसतो.
तिच्या चित्रपटाचा दिग्दर्शक "सुनिल" ह्याच्याकडे ती आपल्या ह्या भावना व्यक्त
करते.
तिला आत्महत्या करावीशी वाटते. सुनिल तिला या विचारांपासून परावृत्त करतो. उषा अनेक पुरुषांच्या संपर्कात येते, पण तिला कोणत्याच पुरुषामध्ये आपले माणूस, स्वतःचे हक्काचे घर मिळत नाही. तिचा हा शोध चालूच राहतो.
तिला हवे असते स्थैर्य, मानसिक समाधान आणि जीवनातला आनंद. अशाच एका न कळत्या क्षणी एका धनिकाच्या
प्रेमात पडून त्याच्याबरोबर त्याच्या घरी राहण्याचा निर्णय ती घेते. चंदेरी दुनिया मागे सोडून ती दुर खेडेगावात येते. पण तोही सोन्याचा पिंजरा निघतो. कोणतेही स्वातंत्र्य तिला नसते. झगमगत्या दुनियेत काम करणारी, पण इथे तर तिला घरातून बाहेर पडण्याची
सुद्धा परवानगी घ्यावी लागते. या
धनाढ्य पुरुषाची आधीची पत्नी अपंग असून, अंथरुणाला
खिळलेली असते.
ती मात्र उषाला स्त्री जीवनाचे वास्तव
सांगते. "कैद से समझोता करलो। खाली बिस्तर बदलेंगे, रसोईघर बदलेंगे, मर्दोंके मुखवटे बदलेंगे, मर्द तो नहीं बदलेगा। मान मेरी, कितना भटकोगी उषा।"
पण या घरातील सर्व ऐश्वर्य झुगारून ती
पुन:श्च बाहेर पडते. आता तिला कोणताही हक्काचा निवारा नाही; तर नशिबी आहे हॉटेलची एक खोली; परत ती निर्वासितच. आयुष्यभर वणवण करून उषाला काय मिळाले? ना स्वतःचे हक्काचे घर, ना सुखाचा संसार, ना आपला हक्काचा माणूस. जीवनाकडून तिच्या माफक अपेक्षा होत्या. पण त्याही
पूर्ण होत नाहीत. उषाचा चाललेला शोध अनेक प्रश्न निर्माण
करतो,
अस्वस्थ करतो. स्त्रीची नक्की “भूमिका” काय? असा आणि असे अनेक विचार करायला लावणारे प्रश्न निर्माण
करतो.
हंसा वाडकरांच्या काळातील परिस्थिती आजच्या
चंदेरी दुनियेत कितीशी बदलली आहे? किंवा आजच्या रोजच्या जीवनातही किती बदलली आहे? असे अनेक
प्रश्न चित्रपट पाहिल्यानंतर मनात काहूर माजवतात.
चित्रपटात सुरु झालेले प्रश्नोपनिषद इथे
येऊन थांबते. की सुरु
होते? हे ज्याने त्यानेच ठरवायचे.
वैखरी
फडणीस
vaikhariphadnis@gmail.com
No comments:
Post a Comment