‘पालकत्व’ याविषयी थोडक्यात लिहिणे
म्हणजे शिवधनुष्य पेलणे. या लेखात पालकत्वाविषयी महत्त्वाचे मुद्दे आणि आशय यांचा अंतर्भाव
करण्याचा हा एक धाडसी प्रयत्न.
डॉक्टर ‘अभिनंदन!’ असं म्हणून positive pregnancy report हातात देतात
त्या क्षणापासून पालकत्वाची भावना रुजू
लागते. आपल्याला उत्तम पालक कसं होता येईल? आपल्या बाळाला एक सुरेख आयुष्य देता कसं देता येईल? असे अनेक प्रकारचे विचार मनात फेर धरू लागतात.
याच बरोबर एक अनामिक हुरहुरही असते की सगळं नीट पार पडेल ना? सोबत बऱ्याच गोष्टी सुरू असतात. बाळाची काळजी कशी घ्यावी यावर अनुभवींचे
सल्ले, मार्गदर्शन, माहितीपर लेख, videos आणखी बरंच काही… आई-वडील म्हणून भूमिका पार पाडायच्या म्हणजे एक
प्रकारची roller-coaster
ride आहे. रोज येणाऱ्या नवनवीन आव्हानांना प्रत्यक्ष सामोरे जाताना
दमछाक होते. त्यातही एक समाधान असते. आनंद असतो.
पालक आणि मुलं यांच्यातील संवाद -
यामुळे एक कौटुंबिक सुरक्षिततेची भावना
निर्माण होते. आईवडील दोघांच्याही मुलं वाढवण्याच्या/ संगोपनाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. पण मुलांशी
बोलताना पालकांमध्ये स्पष्टता हवी. जेणेकरून मुलांना कोणाचे ऐकावे हा संभ्रम पडणार नाही. मुलांचे वय आणि आकलनशक्ती लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला अपेक्षित
असलेला अर्थ समजला आहे ना याची खात्री करावी लागते.
प्रत्येक कुटुंबाचे काही नियम असतात. त्यातील कोणते negotiable आणि कोणते not
-negotiable आहेत याची स्पष्ट कल्पना देणे जरुरीचे.
उदाहरणार्थ -
खोटे बोलणे काहीही झाले तरी चालणार नाही.
मुलांच्या कोणत्याही प्रश्नांवर एकदम प्रतिक्रिया
देण्याऐवजी मुलांचे मत आणि मुलाची त्यामागची भावना- कारणमीमांसा समजून घेण्याचा प्रयत्न व्हावा. त्यामुळे आपलं मत
महत्त्वाचं आहे याची जाणीव मुलाला होते. एकमेकांशी संवाद साधण्याचे मार्ग
मोकळे राहतात.
५ वर्षाची मुलगी रिया (नाव बदलून ) आईला घरी येऊन सांगते कि बसवाले uncle मला बसमधून उतरताना
रोज एक पाठीवर चापट मारून उतरवतात. मला ते अजिबात आवडत नाही. आई तू त्यांना सांग ना... ‘हो सांगते’ म्हटल्यावरही आईने सांगायला बरेच दिवस लावले. एक दिवस
रिया शाळेत जायला तयार होईना, कारणही समजेना. रिया काही बोलायला तयार नाही. पण
माझ्याजवळ चटकन बोलता बोलता म्हणाली, “आईचं माझ्यावर प्रेमच नाही. अजून बसवाल्या अंकलशी ती बोलत नाही. मला नाही जायचं शाळेत.” मग दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी आईनी जाऊन
रियासमोर तिच्या बसवल्या अंकलना चांगली तंबी दिली.
मुलांशी बोलण्यापूर्वी तीन आयुधं जवळ असणं अत्यावश्यक आहे - patience, tolerance आणि understanding. मुलं जेव्हा काही सांगत असतात तेव्हा
प्रथम सर्व ऐकावं, मग त्याला एकूण कसं वाटतं आहे असा प्रश्न विचारून भावनिक जवळीक
साधावी. नाहीतर मुलाचा आपण नेमकं काय करण अपेक्षित आहे, कसे वागावं असा गोंधळ उडू शकतो.
मुलांमध्ये स्वयंशिस्त हा धडा जिरवताना आई वडिलांचा जीव अगदी जेरीला
येतो. पण अगदी सोप्या गोष्टी जसं - शाब्दिक कौतुक, अनपेक्षित मिळालेली कौतुकाची थाप
मुलांना बरंच काही शिकवून जाते. शिस्त नाही - मुलं ऐकत नाहीत ही वाक्य नेहमीची. मुलांकडून अपेक्षित असलेलं वर्तन स्वतःच्या आचरणात असेल तर ते
मुलांना अंगीकारण सोपं जातं. रोजच्या संभाषणातून शिस्तीचे फायदे
जास्त लवकर समजावता येतात.
अभ्यास हाही असाच एक पालकांना आणि मुलांनासुद्धा काळजीत टाकणारा
विषय. मुलाची कुवत आणि क्षमता याचा जर आढावा घेतला तर अभ्यासामुळे
निर्माण होणारे ताणतणाव कमी व्हायची शक्यता. परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवर मुलाची गुणवत्ता ठरत नाही. मासा पाण्याबाहेर कसा पोहेल? बरेचदा आपला मुलगा/
मुलगी आयुष्यात पुढे अव्वल राहतील ना? त्याला/ तिला जॉब
मिळेल ना? आर्थिक अडचणी येतील का? पण या सर्व गोष्टी उघडपणे बोलून चिंता कमी करता येते. मी कसं लोकांना सांगू माझा मुलगा (मुख्यतः)
बी. ई. नाही बी. ए . करतोय? मी स्वत: एक IITअन आहे? सगळ्या सुविधा असताना अभ्यास करता येत नाही का? ह्या
विचारांचा त्रास होणार नाही.
मेधा (नाव बदलून) २७वर्षाची software engineer,वर्गात पहिलीपासून
पहिला नंबर येणारी मुलगी. science आणि maths यात नेहेमी पैकीच्या पैकी मार्क. १०वी -१२वीत बोर्डात, engineering ला गोल्ड मेडल. कॅम्पस interview
मध्ये लगेच नोकरी. दरवर्षी उत्तम performance award. आज ती सांगते, माझी टीम मला कामात सहकार्य करत नाहीये. माझं कोणाशीही जमत नाही. काय करू? तिला संभाषण कला अवगत
करायला बरेच कष्ट पडले.
सध्याचं नवीन आव्हान म्हणजे internet / phone चा अमर्याद वापर. जणूकाही त्याशिवाय जगताच
येणार नाही अशी पक्की समजूत. किती वेळ त्यावर घालवावा हा वादाचा मुद्दा. पण technology
चा वापर कोणत्या कारणासाठी करताय, यावर ते अवलंबून असावे. फक्त use आणि abuse यातले अंतर पक्के माहित असावे लागते. जेव्हा तंत्रज्ञानाच्या
वेडापायी रोजच्या रोज स्वतःच्या शरीराची काळजी घेतली जाणार नाही तेव्हा
तज्ञांच्या सल्ल्याची गरज आहे हे निश्चित समजावे.
अपेक्षा आणि अपेक्षापूर्ती या परस्पर सापेक्ष संकल्पना आहेत. पालकांच्या मुलांकडून आणि मुलांच्या पालकांकडून अपेक्षा असतात. पण त्याचा
अर्थ एकच असतो तो वास्तवाचा स्वीकार.
आलेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची योजना. अशीच एक case - वडील बँकेत, आई शाळेत शिक्षिका. मुलगा IIT मधून M.Tech झाला. नोकरीच्या अनेक
संधी चालून आल्या. मुलाने सांगितले, आई, बाबा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी M.Tech झालो. पण मला UPSCच्या परीक्षा देऊन Govt job करायचा आहे.
त्याच्या तयारीला लागतो आहे. आईवडिलांनी सांगितले आम्ही फक्त एकमेकांकडे पाहिले...
हे काय झाले?
यात मुलाने आणि पालकांनी वास्तव स्वीकारले आहे.
चांगलं, बरं, वाईट, सोपे, अवघड या सगळ्या शब्दांची निश्चित
व्याख्या करणे अत्यंत कठीण काम आहे. कारण प्रत्येक जण आपल्या जागी बरोबर आहे.
डॉ. पूर्वा
रानडे
poorva.ranade@gmail.com
No comments:
Post a Comment