नीलिमा ऑफिस मध्ये कामात गढून गेली होती. आजचा सगळा दिवस मीटिंग वर मीटिंग असा
पूर्ण busy जाणार. रोजचं काम बघायला सुध्दा फ़ुरसत मिळणार नाही. ती
सिनियर मॅनेजर असल्याने बरेचसे महत्वाचे निर्णय तिलाच घ्यावे लागत. घर आणि ऑफिस
अशा दोन्ही जबाबदाऱ्या ती अगदी सहज पार पडत होती. नवरा एका मल्टिनॅशनल कंपनीत अधिकारी होता.
कामानिमित्त त्याला काहीवेळा बाहेर जावे लागायचे. एकच मुलगा सौरभ, शाळेत आठवीत होता. तोही अभ्यासात, खेळात
अव्वल. सगळं नीट नेटकं. काहीच टेन्शन नाही.
मीटिंग चालू असतानाच तिला फोन आला. तिने नुसते पाहिले. आणि ती 'excuse me' म्हणून कॉन्फरन्स रूम मधून
बाहेर आली. शाळेतून मुख्याध्यापिका आगाशे बाईंचा फोन होता. तिला एक क्षण भीती वाटली. शक्यतो लवकरात लवकर भेटायला या. सौरभ बद्दल
बोलायचे आहे. काळजीचे कारण नाही. पण एकदा भेटणे गरजेचे आहे. असे म्हणाल्या.
आता जरा निलीमाला धीर आला.
जेवणाच्या सुट्टीत पटकन जाऊन यावे असे ठरवून ती निघाली. जाताना मीनाला सांगून
गेली, की मी जरा सौरभच्या शाळेत जाऊन येते. शाळेत पोचल्यावर
नीलिमा तडक आगाशे बाईच्या रूमपाशी आली. बाहेर उभ्या असलेल्या शिपायाने नाव विचारून बसायला सांगितले.
तिला मात्र सारखे वाटत होते असे फोन करून बोलावले, नेमकं काय झालंय? वेळ लागतोय असे पाहिल्यावर तिने मीनाला आज मी लंच नंतर ऑफिसला येत नाही हेही सांगून टाकले. शेवटी तिला आत बोलावलं. आगाशे बाईंनी वेळ न लावता
शाळेच्या समुपदेशक डॉ.निहारिका मौलीना बोलावले.
निहारिका मॅडम आल्यावर त्यांनी निलीमाला बोलावण्याचे कारण सांगितले. गेले काही दिवस सौरभचे वर्गात
लक्ष नसते. वर्गात बसून राहतो. मित्रांबरोबर डबा खायलाही बाहेर जात नाही. फारसा खेळतही
नाही. वर्गात गप्प गप्प असतो. हा त्याच्यातील बदल बऱ्याच शिक्षकांना जाणवतो आहे. त्याचा परिणाम
त्याच्या अभ्यासावर होण्याची शक्यता आहे. घरी सगळे नीट आहे ना? हे ही जाणून घ्यायचे होते. यासाठी आज मुद्दाम फोन करून बोलावले व तुमच्या कानावर घातले. तसं सिरीयस काही नाही, पण वेळीच याकडे लक्ष दिलेले बरे.
पण 'समुपदेशन' हा शब्द ऐकल्यावर नीलिमा जराशी घाबरली. तिने डॉ. मॅडमना विचारलं की आता पुढे कसं जायचं ? तुम्ही बोलणार का मी बोलू ? डॉ. म्हणाल्या 'अहो, ते आपण ठरवू.
"सध्या समुपदेशन हा शब्द फारच ऐकायला
येतो नाही? मला काही प्रश्न आहेत डॉ. त्यासाठी
मला तुम्ही केंव्हा वेळ देऊ शकाल?"
नीलिमाने विचारले.
"उद्या दुपारी एक नंतर केंव्हाही
चालेल. पण
तुम्ही बिझी असता ना?" डॉ. म्हणाल्या. पण
नीलिमा म्हणाली 'हे जास्त महत्वाचे आहे. मी उद्या दुपारी येते.'
नीलिमाने मनात येत असलेले सगळे प्रश्न लिहून
काढले. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ती डॉ. निहारिका ना भेटायला आली. तिलाही आता
सगळ्या शंकांचे निरसन होणार ह्याचे बरे
वाटत होते.
नीलिमा - समुपदेशन म्हणजे नेमके काय? उपदेश /सल्ला असं काही का?
डॉ.. - हो तसंच काहीसं. पण त्याचं स्वरूप हे समुपदेशन कोणत्या कारणासाठी केलं यावर अवलंबून
असतं. समजा एखाद्या मुलाला किंवा मुलीला पुढील शिक्षण घेण्यासाठी कोर्स निवडायचा
असेल तर त्याला मार्गदर्शन वेगळ्या प्रकारानी
केलं जातं. त्याकरिता टेस्ट असतात. त्यावरून मुलाचा कल कोठे आहे हे समजून घेता
येते. कोर्स निवडीसाठी याची मदत होते. हा समुपदेशनाचा एक प्रकार झाला. आता
आपण सौरभ विषयी बोलू. त्या आधी मी उद्या सौरभशी बोलते आणि मग नंतर पुढचे पाहू.
दुसऱ्या दिवशी सौरभला क्लासमध्ये चिठी पाठवून त्यांनी बोलावले. सुरवातीला सौरभ जरासा धास्तावला. पण डॉक्टरनी
त्याला समजावले की
serious काही नाही. घाबरून जावू नकोस. तुझ्या
टीचर्सच्या मतानुसार तुझे अभ्यासातील लक्ष थोडे विचलित झाले आहे. यावेळी तुझे
मार्क ही कमी झालेत. याबद्दल चौकशी करायची
होती. या विषयी तुला स्वतःला असे जाणवते आहे का?
तर आपण त्यावर लगेच काम करू शकतो.
सौरभ: हो मॅडम मलाही
असे जाणवते. अभ्यासाला बसलो की मनात दुसरेच विचार येत असतात. काय
वाचतोय याकडे लक्ष केंद्रित करता येत नाही. वर्गात सुद्धा असेच होते.
डॉ. - बरं
नेमके काय विचार येतात हे सांगू शकतोस का?
सौरभ- हो. पुढे काय ? कोणता अभ्यासक्रम निवडायचा? मनापासून
मला MBBS व्हायचे आहे. पण तो अभ्यासक्रम खूप खर्चाचा आहे,
शिवाय खूप वेळ लागतो. किती वर्ष? अशा
विचारांनी मेंदू नुसता चक्रावून जातो. रात्री झोप येत नाही त्यामुळे वर्गात
बसलेल्या बसल्या पेंग येते. घरी आई बाबांना उगीच tension नको
म्हणून काही सांगत नाही. पण ते खूप समजूतदार आहेत. यावर काय करता येईल डॉ.?
डॉ. -good. निश्चीत
यावर आपल्याला काम करता येईल. आता पासून पंधरा दिवस आता आपण काय करतोय त्याचा
विचार करायचा. विचार मनात येतील पण त्यांना प्रयत्नपूर्वक दूर सारून हातातल्या
कामाकडे लक्ष द्यायचे. सुरुवातीला थोडा त्रास होईल पण हळू हळू जमेल. दोन आठवड्यानी आपण परत भेटू. मध्ये काही शंका असतील तर जरूर ये.
पंधरा दिवसांनी डॉ.नी शिक्षिकांना विचारले की सौरभ
आता कसा आहे? तेंव्हा त्याच्या
मध्ये थोडासा बदल दिसतो आहे त्यांचे मत पडले.
निलीमाला ही बोलावून विचारले घरी सौरभ कसा आहे? त्याला मी कल्पना दिलेली आहे की आईशी
तुझ्याबद्दल बोलणे झाले आहे. नीलिमानेही सांगितले की
आम्ही दोघे हॉल मध्ये बसलेलो दिसलो, की येतो,
बोलतो. तुम्ही सुचवल्याप्रमाणे आम्हीही त्याला सारखे प्रश्न विचारत नाही. फक्त ऐकून घेतो.. हळू
हळू तो यातून बाहेर पडेल असे वाटते. thank you so much डॉ. .
पण एक सांगू? समुपदेशन/counselling
बद्दल एक उत्सुकता निर्माण झाली आहे. ही सगळी
प्रकिया जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. आता मलाही याचा फायदा दिसतो आहे.
तुम्हाला वेळ असेल तेंव्हा शनिवारी दुपारी ४ नंतर
महिन्यातून एकदा भेटूया का?
डॉ. - हो
नक्की. मला पण counselling विषयी तुमच्याशी बोलायला
नक्कीच आवडेल. ठरलं तर मग. महिन्यातून एका शनिवारी ४ नंतर
भेटायचे.
All the best
डॉ. पूर्वा रानडे
No comments:
Post a Comment