समुपदेशन-६


इतक्यात माझ्याकडे एक case आली होती, २२ वर्षाचा निखिल (नाव बदलून) सांगत होता, मला जगायची इच्छाच नाही. कारण विचारलं तर म्हणाला माझा break up झाला. माझी काय चूक झाली हे सुद्धा न सांगता ती निघून गेली. माझा phone तिने block केला. contact करायचे सर्व प्रयत्न करून पहिले ..... मला काय करू काहीच सुचत नाही. झोप येत नाही, जेवावेसे वाटत नाही, अभ्यासावर focus होत नाही. असं एकदम सगळं भरभर बोलला.

जरा शांत झाल्यावर मी विचारलं घरी माहिती आहे का? तो नाही म्हणाला. किती दिवसापासून तुमच्या गाठी भेटी सुरु आहेत? मग त्याने सांगायला सुरुवात केली. इंजिनीरिंग झाल्यावर मी MBA ला ऍडमिशन घेतली तेंव्हा तिथे आमची प्रोजेक्टच्या निमित्ताने ओळख झाली. आम्ही तसेच भेटत राहिलो. मलाही ती आवडायची. आमचे विचार चांगले जुळत होते. दोघांनी नोकरी मिळाली की लग्न करायचे इतके ठरले. नुकतीच आमची exam संपली ती घरी गेली. ती मूळची सोलापूरची. इकडे शिकायला आली. खूप हुशार आहे. सगळं शिक्षण scholarship वर झालय. घरी आई वडील आणि एक भाऊ आहे. वडील college मध्ये शिकवतात. आई शिक्षिका आहे. एकदम सगळं संपलं असं वाटतंय, मी डिप्रेशन मध्ये जातो आहे असे वाटते आहे. pl. help me.

त्याच्या आई-वडिलांशी बोलल्यावर लक्षात आले, की तो लहानपणापासून अतिशय हट्टी आहे. त्याने एकदा एखादी गोष्ट पाहिजे असे ठरवल्यावर त्याला ती पाहिजेच. and he becomes very possessive. त्याचे शाळेतही फारसे कोणाशी पटत नसे. मुलांच्यात खेळायला गेला, तरी भांडण करून परत. मित्र ही झाले, तरी फारसे टिकायचे नाहीत. एकटाच पडायचा. जमवून घ्यायला जमलं नाही. नंतर मी आणि निखिल relationship - नातेसंबंध याविषयी सविस्तर बोललो. नाते म्हणजे नेमके काय, ते कसे टिकवावे, नात्याचे महत्व याबद्दल तीन / चार sessions घेतली. 

नाते महत्वाचे का वाटते आहे यावर विचार मंथन जास्त जरुरीचे वाटते.

आपल्या मनातील भावना, विचार, कल्पना व्यक्त करणे ही माणसाची एक सुप्त गरज असते. माध्यम कोणतेही असेल फोन, ई-मेल, मेसेज, किंवा समोर बसलेली व्यक्ती. संवाद साधल्याचे समाधान एक वेगळे  असते. विचारांची देवघेव सुरु होते आणि नकळत एका नात्याची सुरुवात होते. नाते  जपण्याची गरज दोघानाही वाटणे आवश्यक आहे, तसंच ते निभावणे तितकेच जरुरीचेही वाटले पाहिजे. अन्यथा एकांगी नात्यात दुसऱ्याची घुसमट व्हायचा संभव असतो. असे नाते फार काळ टिकू शकत नाही.

नाते नुसतं जपणं आणि ते दृढ होत जाणं यासाठी दोन्हीकडून थोडे प्रयत्न व्हायला हवेत. त्याचे फायदे कितीतरी पटीने जास्त असतात. एकटेपणा माणसाला फार काळ सोसवत नाही. त्यामुळे एकाकीपण (Loneliness) येऊ शकते. माणसाला माणूस असणं ही कल्पना सुद्धा एक सुरक्षिततेची भावना देणारी असते.
आज technology revolution च्या जमान्यात what's app, Instagram यावरून नातलग, मित्रपरिवार एकमेकांच्या संपर्कात असतात.

आजूबाजूच्या बदलणाऱ्या परिस्थितीशी जमवून घेताना आपण स्वतः आपल्यात गुंतून पडतो. त्यामुळे असेल कदाचित, पण दुसऱ्याच्या बाजूने विचार करायला पाहिजे, तितका आपण करत नाही. तेवढा वेळ नात्याला देता येत नाही. त्यामुळे अशावेळी नात्यातील ओलावा कमी होऊ शकतो. नात्याचे नाव हे कोणतेही असेल, नातेही खाजगी असेल वा ऑफिसातील असेल  पण त्यातील असणारा दुवा महत्वाचा.

नवीन नाती निर्माण करत असताना किंवा जुनी जपत असताना एकमेकांवरील विश्वास महत्वाचा. पण विश्वास नेमका येतो कुठुन? आणि आणायचा कसा? उत्तर फार सोपे आहे.... न घाबरता स्पष्ट/मृदू आवाजात अगदी खरं सांगायचे. त्यावर दुसऱ्याने विश्वास ठेवायचा का नाही याची जबादारी आपण घेऊ शकत नाही. कारण ते समोरच्याने ठरवायचे असते. मनात येणारे प्रश्न मोकळेपणी विचारायचे. कोणताही पूर्वग्रह दूषित संवाद विश्वासाच्या आरशाला चरा /ओरखडा पडू शकतो. सुरवातीला थोडा वेळ लागतो. एकदा का विश्वास बसला की नात्यात पारदर्शकता येते. मग ही वीण घट्ट होते. दुसऱ्याच्या मनात विश्वास निर्माण करायला लागणारा वेळ हा व्यक्तिसापेक्ष असतो.
अजून एक नेहमी ऐकायला येणारं वाक्य म्हणजे "मला माझी space हवी" पण म्हणजे नेमकं काय हे मात्र फार कमी जण सांगू शकतात. अर्थ खरतर एकदम सोपा आहे- मी माझं  मत स्पष्टपणे /प्रामाणिकपणे मांडू शकते का? त्याला विचारांमागची भूमिका/कारणमीमांसा ठोस असावी लागते. मला वाटतं म्हणून मी करणार ही space होऊ शकत नाही.

परिस्थिती हा अजून एक महत्वाचा धागा relationship बद्दल, नात्यांबद्दल लिहिताना जाणून घ्यायला हवा. स्वभाव/ विचार / कृती यात बदल घडायला परिस्थिती कारणीभूत असू शकते. व्यक्तीला आलेल्या अनुभवामुळे त्याची विचारधारा आणि वागणे यात फरक होऊ शकतो….  आपला स्वभाव/ दृष्टिकोन बदलायला हवा आहे याची जाणीव होण्यास वेळ लागतो. तोपर्यंत गैरसमज झालेले असतात. आधीच कल्पना करून आपले विचारच बरोबर आहेत असा समज नवीन अडचणी निर्माण करतो. जेंव्हा आपण परिस्थिती बदलू शकत नाही तेंव्हा आहे त्या प्रसंगाला कसे सामोरे जात येईल याचा विचार होणे गरजेचे असते.

अस्मिता (नाव बदलून ) ४६ वर्षांची, दोन मुले, नवरा असं छोटे विभक्त कुटुंब. अचानक सासू-सासरे आता आपल्याकडेच राहणार या कल्पनेनं तिला टेन्शन यायला लागले. इतके दिवस आपण स्वतंत्र सगळं manage करत होतो. आता आपल्याला जमवून घेणे जमेल का? त्यांचे आणि मुलांचे पटेल का? असे अनेक प्रश्न?
पण आमचे सेशन झाले तेंव्हा हेच लक्षात आले की परिस्थिती अजून यायची आहे, पण त्या आधीच शंका / अडचणी यांचे डोक्यात काहूर!!! त्यावर मी कशी वागेन   आधीच काय काय स्पष्ट सांगेन याचा सतत विचार केल्याने तिला headache/ sleeplessness असा त्रास सुरु झाला. तिला जेंव्हा समजावले की अजून तुझे सासू-सासरे आलेले नाहीत तू आधीच विचार करू नकोस. ते येतील तेंव्हा प्रसंगानुरुप निर्णय घे. आता ती आणि ते दोघं एकमेकांशी जमवून घेण्याचा प्रयत्न करताहेत.

संवाद - एकमेकातील संभाषणाचा दुवा हा नाती जोडतो, नाहीतर तोडतो. संवाद साधताना दोघांनीही आपण जो विचार आहे, तेच बोलत आहोत ना याचे तारतम्य बाळगायला हवे. शक्यतो मागचे references (तू अस केलं होतंस.... ) जोडू नयेत. मला नेमके काय बोलायचे आहे, त्यापेक्षा का बोलायचे आहे हे आधी सांगितले पाहिजे. समोरचा त्याप्रमाणे कसे प्रत्युत्तर द्यावं हे ठरवू शकतो.

रिया १८ वर्षांची कॉलेज कन्यका आईला मैत्रीणीबद्दल सांगायला गेली. तिला फक्त ते आईसोबत share करायचे  होते. पण आईने मात्र तिलाच वेडे वाकडे प्रश्न विचारून, सल्ले देऊन बेजार केलं. परिणाम असा झाला की रियाने आईला काही सांगणं बंद करून टाकलं. आई परत तिकडून ओरडली की रिया तू माझ्याशी पूर्वीसारखं सगळं बोलत नाहीस !!!!!
हे आपलं थोडंसं घरगुती नातेसंबंधाविषयी
पण How to maintain professional relationships हा मात्र एक स्वतंत्र विषय........त्यावर नंतर बोलूया.

डॉ.पूर्वा रानडे


No comments:

Post a Comment