दादा एक गुड न्यूज आहे


मित्रमंडळ बंगलोरने संक्रांती निमित्तानेदादा एक गुडन्यूज आहेहे बहुचर्चित मराठी नाटक आणले. संदीप उन्नीकृष्णन हॉल इथे ते १६ फेब्रुवारी ला सादर करण्यात आले. हे नाटक, मराठी नाट्यरसिकांच्या चर्चेत आले ते त्याच्या नावामुळे! बाळाची चाहूल लागल्याची 'गुड न्यूज' धाकटी बहीण मोठ्या भावाला देणार हे चित्र मनांत नोंदवलेलं पण ती बातमी एवढी धमाकेदार असेल असं प्रेक्षकांच्या स्वप्नातही नव्हतं.
दादा झालेला उमेश कामत नी धाकटी बहीण झालेली ता दुर्गुळे हे ह्या नाटकाचं वैभव!! दुसरं कुणीही इथे शोभणारच नव्हतं. दोघांनाही अभिनय करावा लागलेला नाही. ता एकाच वेळी गोडही दिसली नी कणखरही वाटली. इतक्या लहान वयात अभिनयावरची पकड जबरदस्त. उमेशने प्रेमळ नी विचारी भावाचं बेअरींग असं आणलं, की हा खराखुराच भाऊ वाटावा. आरती मोरेनी रंगवलेली मिथिला नी षी मनोहर ने रंगवलेला बॉबी  वैशिष्ट्यपूर्ण!
नाटक सुरू झाल्यावर पहिल्या पाच मिनिटातच, नाटकाची नी प्रेक्षकांची वेव्हलेंग्थ जुळली. लेखिका कल्याणी पाठारेंनी नाटकाचे संवाद चुरचुरीत लिहितानाही अतिरेक केलेला नाही. ओढून ताणून विनोद निर्मिती केलेली नाही त्यामुळे आशय अबाधित राहिला आहे.
आईबाबांवर बहीणभावांनी केलेली टीका थोडक्यात आवरली असती तरीही नाटकाने तोच परिणाम साधला असता असं वाटलं. बहीण भावातलं प्रेम दाखवण्यासाठी आईवडीलांच्या व्यक्तिरेखा संवादातून जास्त निगेटिव केल्यासारख्या वाटल्या.
कधी गंभीर वळणाने जाता जाता, दुसऱ्या क्षणी प्रेक्षकांत हास्याची खसखस निर्माण करणं हे मुरलेल्या दिग्दर्शकांवाचून शक्य नाही. अद्वैत दादरकरांनी सर्वच पात्रांच्या टाईमिंगवर भरपूर मेहनत घेतली असणार ह्यात शंका नाही. त्यामुळे दुय्यम व्यक्तिरेखाही दुय्यम राहिल्या नाहीत. प्रत्येकालाच नाटकांत पुरेसा वाव मिळाला. चौघांच्या खांद्यावर नाटकाचा तंबू मजबूतीने ऊभा राहीला.
एकाचवेळी भावनांना हात घालून प्रेक्षकांच्या डोळ्यातून आसू काढण्याची नी खळखळून हसवण्याची किमया त्यांनी सहजतेने करून दाखवली.
नेहा भदे


No comments:

Post a Comment