भावंडात मोठा भाऊ
त्यास म्हणती रे दादा
ऐट त्याची आहे भारी
करी रुबाब तो जादा
हवे त्याला सारे घेई
वट त्याचा घरी दारी
येता कोणी त्यासी आड
करी नित दादागिरी
चूकीवर ओरडतो
मनी न ठेवी तो पाप
भावंडांच्या भल्यासाठी
बापामागे होतो बाप
नाते बहीण भावाचे
आहे सर्वांग सुंदर
भावंडांच्या मनी वसे
दादा प्रति रे आदर
जाता बालपण मागे
शिरी पेली जिम्मेदारी
लहानग्या जीवासाठी
खातो अर्धीच भाकरी
रक्षणार्थ बहिणीच्या
हाती तो राखी बांधतो
दुरावल्या दुखावल्या
आप्त नात्याला सांधतो
युवराज जगताप
No comments:
Post a Comment