दीपावली, आलीस काय,
अन् चाललीस काय...
वाट पहायला लावून
संपूर्ण वर्ष..
सा-यांना पाहून सहर्ष....
ठेवून तुझा ऊटण्याचा
सुंदर सुगंध घरभर ...
नाचत वावरशील
आता तू मनभर ...
भेटवून सा-या सुह्रुदांना
नवा हुरूप देऊन नात्यांना
दिल्यास तू मधुर आठवणी
गात रहावीत मैत्रीची प्रेमाची गाणी....
लख्ख प्रकाशाने अंतर्मन निघालंय उजळून
अंधःकाराची काजळी गेलीय निघून...
मनामनांत लावून आशेची दीपज्योत
दिवाळी तू म्हणजे उत्साहाचा स्त्रोत...
जाग्या केल्यास बालपणीच्या आठवणी....
तो किल्ला...त्या फुलबाज्या
आईच्या हातचा फराळ
आणि सा-या घरभर तिचा फिरणारा हात .....
दिलास अन् देतेस तू आनंद अपार
सजवायला मिरवायला तुझाच तर आधार....
तुझ्यामुळे अंधार येई सरत
तुझ्यामुळे अंधार येई सरत
दीपावली तू लवकर ये ग परत!!
No comments:
Post a Comment