सकाळी उठल्यापासून कोणाच्या वेदना नाहीत
की कोणाचे आर्त स्वर ऐकायचे नाहीत,
नाही म्हणायला काही जण सांगतात आनंदाच्या, समाधानाच्या गोष्टी
पण ‘मला सुखी, समाधानी ठेव’
हीच इच्छा, नाही तसा आग्रह असतो ज्याचा त्याचा
एरवी गर्दीत पुढे जाताना बाजूच्याला धक्का देताना मला विसरतात,
खायला पुढे केलेला हात त्यांना दिसत नाही
एवढंच कशाला,
त्यांच्याच साठी राबणा-यांनाही ते विसरतात,
अगदी अगदी गृहीत धरले आहे त्यांनी सगळ्यांना
अगदी मलासुद्धा.
काही दिवसांकरिता का होईना
बंद झालेत माझे दरवाजे
आता उघडायचे त्यांना त्यांच्या बंदीस्त देवालयाचे दरवाजे.
मी आहेच, तेव्हाही होतो
सुख समाधानाचे बीज घेऊन
मी वसलोच आहे त्यांच्या अंतर्मनात….
ते विसरले
हे दरवाजे बंद झाल्यामुळे,
कदाचित
त्याना सापडेल ते सुखसमाधानाचे बीज
आणि नाही लावावे लागणार वशिले त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी,
नाही बंद करावे लागणार
No comments:
Post a Comment