असशी तू स्त्री शक्ती
अनेक रुपे तू दाविशी,
जननी तू सा-या जगाची
तुझ्या कृपेची आस
मजशी|
तव करी वीणा शोभती,
मंगल शांत सोज्वळ मूर्ती
शारदा नांवे तुजला वदती|
विष्णू पत्नी वंदन
तुजला,
प्रगटली तू समुद्र
मंथना
आशिष तव दे मजला|
करूनी कृपेचे अमृत सिंचन,
सदा चित्ती राहो तव चरण
अन्नपूर्णे तुझेच मनीं चिंतन|
अंबा कालिका रेणुका
तूच वसशी विविध रुपात,
ममता भरली तव हृदयात
जननी माता ललना स्वरूपात| तूच दर्शवी तुझीच रूपे
काळ वेळ पाहून प्रसंगाते,
क्रोध राग माया ममता
वसती नवरस तव ह्दयाते|
वैशाली वर्तक
No comments:
Post a Comment