कुणी पसरला शोक?
टोचे देठांनाच आता,
पाकळ्यांचे तीक्ष्ण टोक!
तुझे जाणे, ना सामान्य,
आनंदाचा हा युगांत!
संवादिनीला असह्य,
तिच्या भात्याचा आकांत!
मंगेशाच्या मंदिरात,
देई हुंदका ओंकार!
घंटा बडवून सुद्धा,
तिचा गोठला झंकार!
कुणी कुणाचे सांत्वन,
आता करायाचे सांग?
आसवांच्या पाठीमागे,
उभी हुंदक्यांची रांग!
कोणताही भाव नाही,
तुझ्या गाण्यातून वर्ज!
पिढ्यापिढ्यांना हवेसे,
तुझे सप्तसुरी कर्ज!
दुस्वासाने "लता" शब्द,
उलटाही केला तरी!
तोही "ताल होतो आणि,
येई संगिताच्या घरी!
हमसून रडे नांदी!
साती स्वर वेडेपिसे,
शोधतात त्यांची दीदी!
मंगेशीच्या गाभाऱ्यात,
ज्योत स्फुंदे समईत!
अभिषेकही तुटक,
धार विसरली रीत!
वाट पाही दिनानाथ,
त्यांच्या लेकीची स्वर्गात!
तीही चालली तृप्तीत,
अलौकिक स्वर गात!
आज क्षितिजावरती,
सूर्य उगवला नाही!
गेल्या तमात बुडून,
आंधळ्याच दिशा दाही!
प्रमोद जोशी
No comments:
Post a Comment