एक बाग लाजवाब!!!!!



हिरवाईने नटलीएक बाग लाजवाब |

मोहक रंगीत फुलांचान्याराच रुबाब ||



गुलाबी गुलाब, फुलली जास्वंदी लालेलाल |

मुग्ध अबोली स्वानंदे, झोके घेई खुशाल ||


सोनसळी सोनचाफ्याचा, आसमंती घमघमाट|

मधुमालतीच्या कमानीचा, खासाच थाट ||



अनंत, मोगरा, सोनटक्का आणि मदनबाण |

धवल सुगंधी पुष्पात, चित्त रममाण ||






साजरीशी तुळशीमाय, विराजमान वृंदावनी |

वंदू तिज प्रातःकाली,कर दोन्ही जुळवुनी||

फळ भाज्यांनीही आणली, बागेला शान |

डोलतसे अळू, हासतसे फणस रसाळ छान ||


पारणे फेडी नेत्रांचे, आंबा राजा फळांचा |

ताडमाड कल्पवृक्ष जणू , ठाव घेई गगनीचा ||



केशरी मधुर पपईने, भाव किती खावा |

रामफळ, सीताफळ, चिकूचा गोडवा काय वर्णावा ||

हिरवेगार रसरशीत पेरु, करतात फारच धमाल |

उषाताईंच्या मेहनतीची तर, ही सारी कमाल ||

नको तरुवरांना नुसते हवा, अन्न नि पाणी |

बहरून येती जेंव्हा लाभे  , मायेची निगराणी || 


(माझी नणंद सौ. उषा तळेगावकर यांनी त्यांच्या बंगल्यात जोपासलेली बाग बघून मला सुचलेलं काव्य)

सौ.शुभदा पाठक



No comments:

Post a Comment