एकटेपण

 

flicker


गर्द वृक्षराजीच्या पायथ्याशी

थंड सावलीत

बसलोय एकटाच आठवणी चघळीत


माणसांचा उबग येऊन

एकटेपणाच्या सुखात

त्रयस्थाच्या नजरेनं

स्वतःकडे पाहात

 

उन्हं उतरतायत

अंधार लागलाय पडायला अन्

माणसांना कंटाळलेला मी

चाललोय परत

माणसांनाच शोधायला.


संजय बापट






 

No comments:

Post a Comment