कुणाच्या आकाशी
चांदण्याला पूर
स्वप्नात बहरे
फुलबाग!
कुणा नभाभाळी
पूर्वा रंगस्नात
फुलते पहाट
वसंतात.
कुणाच्या अंगणी
फांदीवर झूला
जमीन-आकाश
पावलाशी
कुणा सायंकाळी
मुरलीचा स्वर
मीलनसंकेत
कातरवेळ!
कुणाच्या हाताची
भरली ओंजळ
मिटता पापणी
स्वप्नोत्सव!
एखादे चालणे
घाट वळणांचे
दृष्टीपुढे नित्य
उल्कापात !!
मधुस्मिता अभ्यंकर
No comments:
Post a Comment