किती तरी दिवसांत
नाही सखीला गळामिठी
किती तरी दिवसांत
नाही दृष्टीला
दृष्टी
निखळ मैत्रीची ओढ
आहे बालपणापासून
मित्रमंडळी जमवून
दंगा करू मनापासून
केव्हांतरी निसटून जाऊन
मी होईन मुक्त
मनी किती दाटल्यात
इच्छा या सुषुप्त!
आज मनोमन भीती
माणसाला माणूस भेटीची
लागलीये आस
निसर्गासी
माणसाच्या सुजाण
प्रीतीची
लागतील दीप इवले
इवले
उजळेल सारी नगरी
इथे
तरीही कुठेतरी
राहतीलच
दिव्यावाचून घरं तिथे!!
स्मिता शेखर कोरडे
No comments:
Post a Comment