कार्यारंभी तुज प्रथम पुजितो l तुलाच स्मरतो विध्नेश्वरा ll
वंदन करोनी मागते तुजला l बुध्दी दे मजला ज्ञानदाता ll
लावूनी चंदन चर्चीत शेंदूर l वाहू दुर्वांकूर तुजे लागी ll
सर्व व्यापी तूची, तूच लंबोदर l ज्ञानाचा सागरl तू ओंकारा ll
चौदा कलेंचा तूची अधिपती l करिते विनंती तुजेपायी ll
राहो आम्हावरी तव कृपा दृष्टी l नको करु कष्टी कदाकाळ ll
तूची असे कर्ता l तूची करविता l शरण मी आता l भगवंता ll
वैशाली वर्तक
No comments:
Post a Comment