भाकरीच्या चंद्रमाला डाग
आहे
भूक पोटी पेटलेली आग आहे
वेदनेने वार केले सोसले
मी
जीवनाचा हाच काळा भाग आहे
आजही बेकार हाता काम कोठे
धोरणावर शासनाच्या राग
आहे
आतड्याला यातनेचे डोस सारे
अन उडाली झोप नयनी जाग
आहे
सापळा झाला शरीराचा असा
हा
जीव नेण्यास यम माग घेतो
आहे
युवराज जगताप
No comments:
Post a Comment