गोड कोडे




तुझे आणि माझे असे गोड कोडे
कुणाला कळावे कसे सोडवावे?

तुझे हात हातात हे गुंफलेले
तुझ्या गंध स्पर्शात मन गुंतलेले

मला मी न जाणे कसे हारले की
तुझ्या जीवनी का मिसळूनी गेले?

अता आरशात बघते स्वत:ला
कुठे मी? कुठे तु? मला शोधताना

कशी आर्तताही कधी जन्मली ही?
तुला मी पुसावे मला तू पुसावे

रूचीरा
(रागिणी कुलकर्णी )



No comments:

Post a Comment