आठवणींना येई
जेव्हा भरते
मन हे माझे
तेव्हा हळवे होते
कुंद दाटुनी
पाऊस जेव्हा येतो
सज्जामध्ये मीच
एकटा असतो
कुठले पाणी डोळे
ओलावते
मन हे माझे
तेव्हा हळवे होते
आपुला कोणी
जेव्हा जाई दूर
किंवा परतून
येई ना लवकर
कितीही सावरो
अस्वथ जरासे होते
मन हे माझे
तेव्हा हळवे होते
रातराणी ही
दारी फुलून येते
नक्षत्रांनी
आकाश लखलखते
आनंदाच्या
कल्लोळाने उर हे कोंदाटते
मन हे माझे
तेव्हा हळवे होते
पहाटवारा घाली
साद
पक्षी करिती
गोड मधुरसा नाद
देवळातली घंटा
निनादते
मन हे माझे
तेव्हा हळवे होते
संजय बापट
No comments:
Post a Comment