"काय झालं? काळजीत दिसतोयस. कोणाचा फोन होता?" - ती.
"कसली शिळी बातमी देतोयस. हनिमून बुकींग कधीच केलंय
त्यांनी." तो जरा वैतागलेला वाटला म्हणून ती जरा हसत
म्हणाली.
"अगं, ते नाही. लग्नाआधी फिरायला जायचं म्हणतायत ते. अगदी पुढल्याच महिन्यात. इथे दोन महिन्यांवर लग्न आलंय. काय बेअक्कलपणा आहे हा. म्हणे आम्ही मित्रांसारखे जातोय. सेपरेट रूम्स वगैरे बुक करू. मला सांग. हे arranged marriage आहे. Isn't it risky? ह्या आजकालच्या तरूणांची डोकी फिरलेलीच असतात. कधी उठून काय म्हणतील, काय करतील सांगता येत नाही."
"नाही अरे. मला वाटतं ह्या पिढीकडे विचारांची clarity आहे आणि ते बोलून दाखवायची हिंमतही आहे."
"तिचं म्हणणं असं आहे, की 'आजपर्यंत आम्ही फक्त कॉफीशॉप, रेस्टॉरंट अशा
सेटअपमधे भेटत आलोय. काही भेटींतच आम्हाला असं लक्षात आलं की फक्त रुटीन गप्पांतून
आम्ही एकमेकांना नीट समजू शकत नाही. बरेचदा आम्ही समोरच्यावर चांगलं इम्प्रेशन
पडावं म्हणून आपली मतं शुगर कोट करतो. वाद होणारे विषय टाळतो. सगळं हॅप्पी हॅप्पी
चाललंय. म्हणून, ह्या १५ दिवसांत आम्हाला नक्की कळेल की आम्ही
compatible आहोत की नाही.' असं काहीतरी
बरंच ज्ञान देत होती. याचा अर्थ पुढला सगळा निर्णय ह्या ट्रिपच्या रिझल्टवर
अवलंबून असणार. १५ दिवस, पाच ठिकाणं, सतत
फिरणे, आणि हो. बजेट ट्रॅव्हल. म्हणजे शक्य तेवढ्या
स्वस्तात. हे सगळं मला पोरकट आणि फिल्मी वाटतंय."
"मला वाटतंय तुझी बहिणीबद्दलची protective बाजू इथे dominate करतेय. ती आता २७ वर्षांची आहे.
अगदी लहान नाहीये. आत्ता केलेला १५ दिवसांचा प्रवास कदाचित त्यांना पुढच्या
आयुष्यभराच्या प्रवासाला मदत करेल. I know it's a risk..... पण
पुढे ही risk आहेच की? आणि हो, मी तिला ऑल रेडी माझा सपोर्ट कळवलाय. "
"मला कळतोय तुझा पॉईंट. मी तिला कळवतो की I am
ok with it.. बघू या काय होतंय पुढे."
(क्रमशः)
-*-*-*-*--*-*-*-*-
मानस
No comments:
Post a Comment