ईशार्थ

पाच सहा वर्षाचं मूल TV वर बॅटमॅन, पोकीमॅान पाहताना घरोघरी दिसतं. पण त्याच वयात, त्यांना नवेनवे अवतार देण्याचं कुणाला सुचलय? पार्थ सबनीसला नेमकं तेच सुचायचं. जॅपनीज शोज, एनिमेटेड सिरीज, काॅमिक बुक्समधली व्यक्तिचित्रं पाहून त्याच्या कल्पनेला जणू पंखच फुटायचे.वेगळ्याच रूपांत त्याला ती दिसायला लागायची. गाड्यांशी खेळणारं लहान मूल, आपण पाहिलंय. पण कल्पनेने त्या गाडीला,झाडावर लटकलेली, अपघात झालेली, पार उलटीपालटी नि चेपलेली अशा विविध अवस्थांमधे काढायचं हा त्याचा लहानपणापासूनचा छंद! आणि जे डोक्यात आलंय ते जसंच्या तसं कागदावर उतरवायचं ही त्याच्या आईची, अहिल्या सबनीसची शिकवण त्याला अजूनही उपयोगी पडते. अजूनही म्हणजे?

पार्थ सबनीस 

२४ वर्षांचा पार्थ ‘ईशार्थ डिझाईन प्रायव्हेट लिमिटेडचा सर्वेसर्वा आहे. बाविसाव्या वर्षीच कंपनीचा एकमेव संस्थापक आहे. ईशा व पार्थ असं बहीणभावाच्या नावावरून तयार केलेलं कंपनीचं नाव आता आपला ठसा उमटवायला लागलंय. भल्या मोठ्या कन्नड फिल्मचे सेट्स  त्याने दिलेल्या डिझाईननुसार बनवले जाणार आहेत. बरीच मोठी रक्कम निर्मात्यांनी त्यासाठी मोजली आहे. तसच Photography साठी ड्रोनचा वापर तो करणार आहे.. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या दोन आघाडीच्या निर्मात्यांनी त्याच्याशी संपर्क साधला आहे. व लवकरच त्यांचं कामही पार्थला मिळणार ह्यात शंका नाही. हॅालीवूडमधून नुकतीच चौकशी झालेली आहे. तो अजून खूप लोकप्रिय होण्याच्या आधी मी त्याचं घर गाठलं. कट्टयासाठी त्याची मुलाखत घ्यायला!

बंगलोर येथील रायन इंटरनॅशनल शाळेचा विद्यार्थी. शाळेच्या मुक्त वातावरणाचा नि प्रोत्साहनाचा तो आवर्जून उल्लेख करतो. TOI च्या design fest मधे ‘your vision of earth‘ मधे शाळेचा ग्रुप घेऊन तो गेला होता. मुक्त शैलीमधे, मोजमापांच्या बंधनात न अडकता, चित्रं काढणं ही त्याची खास पसंती. तो electrical and electronics engineer आहे. बरीचशी Engineering ला गेलेली मुलं, काही नाही तर निदान graphic design शिकून पाहू म्हणून प्रयत्न करतात. technique शिकतात पण कल्पनाशक्ती ही त्या व्यक्तीतच असावी लागते. कल्पकतेबरोबर लागते ती एकतानता! एका जागी बसून काम करण्याचं त्याचं तब्बल सव्वीस तासांचं record आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘काही जमलं नाही म्हणून हेअसं करत स्वीकारलेला हा पेशा नसून product designing ही त्याची आवड आहे. त्याने मला golden ratio सांगितला. This ratio is 1.618 adhered by nature. ह्या ratioच्या जवळपास तुमचं चित्र असेल तर ते 100% लोकांना आवडतं. Steve Jobs ने Apple मधे हा निर्देशांक सांभाळला आहे.


Engineering ला असताना पार्थला डेंग्यू झाला. कमी हजेरीमुळे परीक्षा देता येणार नव्हतीच. वाया जाणाऱ्या वर्षाचा सृजनासाठी उपयोग करून घे, हा त्याच्या आईचा सल्ला. Internet वर designing च्या साईट्स आहेत. त्यावरून अभ्यासाला सुरुवात झाली. You tube वर videos पाहिले. स्वत:ची चित्रे, facebook वर टाकायला लागला. Fusion 360 tool हे designers साठी वरदानच आहे. कारण फुकटात तीन वर्षं वापरायचा परवाना! तेच पार्थनेही वापरलं. गंमत म्हणजे आता ‘fusion 360 gurus’ म्हणून पुस्तक निघतय त्यात एक धडा पार्थवर आहे.

Auto desk नावाच्या साईटवर त्याने तयार केलेली designs, टाकायला सुरवात केली. पहिली पायरी sketching, मग 3D modelling of each part, मग rendering. ह्यात रंग, पोत, finishes ह्या सर्वाचा विचार होतो. Rendering ने वस्तू खरोखरी कशी दिसेल ते कळून येतं. Grabcad हा असाच एक designers साठी असलेला social platform. सर्व designers इथे आपली designs टाकतात. ती खूप लोकं पहातात. इथेच पार्थची designs, Luxius ह्या घड्याळ कंपनीने पाहिली व त्याच्याशी संपर्क साधला. दोन डायल असलेलं घड्याळ त्याने तयार करून दिले. कंपनी ते स्पर्धेसाठी पाठवणार होती.

ते पूर्ण करायला त्याने १५ दिवस अहोरात्र मेहनत घेतली. एक डायल Android वर तर दुसरं पारंपरीक पद्धतीचं. घड्याळाचं नाव smart PDG watch. Auto desk Maya software वापरून त्याने १०० designs तयार केली. त्यापैकी एक निवडलं गेलं.जोपर्यंत ते सर्वतोपरी उत्कृष्ट दिसत नाही तोपर्यंत त्याचे आईबाबाच पसंती देत नाहीत.

दर वर्षी घड्याळांची जागतिक स्पर्धा होत असते. GPHG च्या website वर त्याने घड्याळाचं design पाठवलं. Geneva watch making grand prix स्पर्धेमधे ते सादर झालं. हे म्हणजे घड्याळासाठीचं Oscar म्हंटलं जातं, जे Switzerland मधे होतं. प्रसिद्ध व मोठ्या कंपन्या  ह्यात भाग घेतात. पार्थचं घड्याळ design for mechanical exception category हा jury कडून देण्यात येणारा पुरस्कार असतो, त्यात नावाजलं गेलं.

शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचं dial असलेल्या घड्याळाची निर्मिती त्याने केली. ती देवेंद्र फडणवीसजी, उद्धव ठाकरेंपर्यंत पोचली. मराठी माणसाचा महाराजांना दिलेला मानाचा मुजरा!

India social hardware यांनी आवाहन केलं होतं. हालचाल करता येण्यासारखा कृत्रिम हात त्यांना हवा होता. निवड पार्थची झाली. त्याचं electrical and electronics ज्ञान उपयोगी पडलं ते इथे.  त्याने engineer व्हावं ही त्याच्या बाबांची, प्रमोद सबनीस ह्यांची इच्छा! बाबांचा मानसिक, वैचारीक व आर्थिक पाठिंबा नेहमीच मिळत गेला. Engineering मुळे Perspective, बघण्याचा दृष्टिकोन हे वेगळे जाणवतात. त्याने design केलेला हात आता testing mode मधे आहे. अधून मधून Gadgets वर blog लिहीण्याचा उद्योग चालूच असतो.

पुढचा काय विचार?

Masters in Industrial Design शिकण्यासाठी इटली इथे जातो आहे. १५ महिन्यांसाठी. पण तिथेही कन्नड सिनेमाचं काम चालूच राहील.

मिळालेल्या पैशांचं काय करतोस? 

नवनवीन technology, नवनवीन tools बाजारात येतात. त्याचं लायसन्स घेण्यासाठी भरपूर पैसे लागतात. Latest versions घेत राहिलं तरच स्पर्धेत टिकून रहाता येईल, हे त्याचं उत्तर.

वाचनाची त्याला जबरदस्त आवड आहे. जुन्यापुराण्या,उत्खनन होत असलेल्या, ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायला नि Nikon P1000 वर फोटो घ्यायला आवडतं. हॅरी पॅाटर सिनेमा पाहताना तो खूप खूष होत होता नि इतरांपेक्षा जास्तच रममाण झाला होता. कारण त्याने पुस्तक वाचताना जी designs, कल्पिलेली होती, ती सिनेमात वापरलेल्या गोष्टींशी बहुतांशी जुळत होती.

त्याचं एक वाक्य मला आवडलं, good tool, good imagination should work in tandem! पार्थ सबनीसला मित्रमंडळातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा!! यशस्वी भव!!

नेहा भदे 

No comments:

Post a Comment