पंचतत्त्वातील तत्त्व "जल" एक तत्त्व असे
पाच तत्त्वांची गरज मानवास सदा
भासे
अन्न वस्त्र
अन् निवारा जरी मूलभूत गरजा
जला शिवाय
जीवन शक्य नसेच समजा
विसंबून जलावरी
जलचर सारी सृष्टी
कसे पिकवीन धान्य पोशिंद्याचा
जीव कष्टी
source: Google |
जलामुळे मिळे
वीज घडे औद्योगिक क्रांती
जलाशिवाय
जीवन म्हणजे चिरविश्रान्तीच..
थेंबे थेंबे
तळे साचे मोल जाणावे
जलाचे
वसुंधरा भेगाळली कसे होईल जगाचे
पाणी हे निसर्गदत्त
तरी जाणा त्याचे मोल
जल जिरवा
मातीत राखू निसर्गाचा
तोल
निसर्गाचा
नसे कोप मानवाचा अती
लोभ
प्रगतीच्या
नावाखाली थांबवूया आता हा क्षोभ.
वैशाली वर्तक
No comments:
Post a Comment