source : Google |
व्हाट्सअप कधी कधी, इतकं काही सांगतं
सारंच कसं भन्नाट,
थक्क करणारं असतं
ही गोष्ट महासागरांची
हिंद नि प्रशांत सागराची
गुण्यागोविंदाने राहतात
शेजारी शेजारी
ना सीमावाद
ना आतंकवाद
ना घुसखोरीचा त्रास
ना घमेंड, ना मिजास
ना सर्जिकल स्ट्राईक
ना एअर स्ट्राईक
सारं कसं छान छान
समजून सवरून
तुझा रंग वेगळा
माझा रंग निराळा
सारं कसं बरोबरीनं
हातात हात घालून
जे निसर्गाला कळतं
सागरांना उमजतं
ते आपल्याला
का नाही समजत?
अशोक हवालदार
No comments:
Post a Comment