जीवन अनाकलनीय...



(c) प्रियांका पाटील 


जीवन कधी गडद, काळोखी निराशा,
कधी लख्ख, शुभ्र, उजळती आशा;

कधी उदास, स्तब्ध, नि:शब्द, शांत,
कधी हर्षोल्हासित, बोलके, बेधुंद;

कधी चंचल, उथळ झरा हे अवखळ
कधी डोह अथांग,ज्याचा न लागे तळ;

कधी निडर ते, कधी ते कातर,
कधी पोक्त तर, कधी अल्लडपर;

कधी जणु कुणि मुनि विरक्त,
कधी ते मोही, लोभी,आसक्त;

कधी गळणारे पान शिशिरातील,
कधी वसंतामधले नवदल;

का वाटावे कधी निर्मळ सारे,
आणि कलुषित कधी दिसावे?

जीवनाच्या किती छटा निराळ्या,
कधी कपटी, कधी साध्या भोळ्या

जीवनाचे हे गूढ उकलेना,
खरे स्वरूप ते कधी कळेना;

जीवन शब्दांत व्यर्थ मांडसी
एक परिभाषा नाहीत यासी,

हेच परि असे सत्य अंतिम,
जो भाव अंतरीचा,भासे ते तत्सम!


मेघना भावे तत्त्ववादी

No comments:

Post a Comment