Just for the Mankind

"तुला कळतंय का, ह्या स्टेजला रिसर्च थांबवणं म्हणजे मागच्या तीन वर्षांच्या प्रयत्नांना मातीत मिळवण्यासारखं आहे. It doesn't make any sense Shiv."

"पण सर, animal testing  गरजेचंच आहे का? मला हे आधी असं सांगितलं गेलं नव्हतं. तुम्ही तेव्हा म्हणाला होतात की आपण काही पर्याय शोधू. Anyways this sensor is ready Sir."

"Not until we validate using animal testing." सर जरा वैतागलेल्या सुरात म्हणाले. तसा शिव त्याच्या जागेकडे परत निघाला. विचारांचा गुंता घेऊन.

अमेरिकेतल्या प्रतिष्ठित नॅशनल इंस्टिट्युट्स ऑफ हेल्थ (एन आय एच) कडून त्याला दहा लाख (एक मिलियन) डॉलर्सची ग्रँट मिळाली होती. बोन क्रॅकींग (हाडांमधला ठिसूळपणा) आधीच ओळखू शकेल असे सेन्सर बनवायचे,  जे म्हाताऱ्यांना आणि अमेरिकन फुटबॉल खेळाडूंना त्यांच्या बोन हेल्थबद्दल माहिती देईल आणि क्रॅक डेव्हलप होण्याआधी वॉर्निंगसुद्धा देईल असं. काही कॅल्शियम सप्लीमेंट कंपन्यांनीही ह्या रिसर्चला मदत केली होती.

या  टेस्टिंगमधे एका मेंढीच्या पिल्लाच्या एका पायाच्या हाडात एक आरपार भोक करायचं, त्या भोक असलेल्या पायावर हे सेन्सर लावायचं. त्या पिल्लाला लोकल अॅनेस्थेशिया देऊन पण एनर्जी बूस्टर देऊन त्या पायानिशी धावायला लावायचं. आणि त्याचं हाड मोडण्यापूर्वी हे सेन्सर बरोबर वॉर्निंग देतं की नाही हे पहायचं. 

सेन्सर ट्युन होईपर्यंत अशी पिल्लं टेस्ट करत राहायची. आणि त्यांना टेस्टनंतर खाली युनिव्हर्सिटीच्या स्लॉटर हाऊसमधे पाठवायचं. तिथे एक मीट शॉप सुद्धा आहे. त्याला हे सगळं अघोरी वाटायला लागलं.

तेवढ्यात सरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला - "शिव, मला माहितीये हे डिस्टर्बिंग आहे. पहिल्यांदा वाटतंच. मलाही वाटलेलं. पण लक्षात ठेव. We all are doing it for the mankind. Just for the mankind."

"At the cost of the kindness of the man Sir. I am not doing this."  त्याने डेस्कवर परत येतानाच ठरवलेलं.

शिव आता एका दुसऱ्या युनिव्हर्सिटीत टेस्टिंगसाठी कृत्रीम हाडं आणि लिगामेंट्स तयार करण्याचा रिसर्च करतोय. त्यामुळे प्राण्यांवर होणारं अघोरी टेस्टिंग कितीतरी प्रमाणात कमी होणार आहे.

आजही त्याला त्याच्या रिसर्चबद्दल विचारलं की तो फक्त, "I am just restoring the kindness of the man. That's more important for the mankind." एवढंच डोळे मिचकावत म्हणतो.

मानस

No comments:

Post a Comment