संत कान्होपात्रा- अहवाल

मित्रमंडळातर्फे गणेशोत्सवात विविध कार्यक्रम सादर केले जातात. दिनांक ७ सप्टेंबर रोजी ‘गंधर्व कला केंद्रा’तर्फे श्रीमती अर्चना बक्षी यांनी ‘संत कान्होपात्रा’ या संगीत-नृत्य-नाट्याचा सुंदर आविष्कार सादर केला. अनेक कलाकारांचा सुंदर मेळ यात साधला होता.

अर्चना बक्षी यांच्या निवेदनातून संत कान्होपात्राचा जीवनपट हळूहळू उलगडत जातो. तिच्या लहानपणापासून ते ती ईश्वरचरणी विलीन होईपर्यंतच्या प्रत्येक अवस्थेचे चित्रण वेगवेगळ्या कलाकाराने फार समर्थपणे सादर केले.
नृत्य-गायनाचे शिक्षण घेणारी छोटी कान्होपात्रा,विठ्ठलाच्या भजन-पूजनात दंग राहून नायकिणीचे जीवन जगण्यास नकार देणारी कान्होपात्रा,विठ्ठलाचे भजन-पूजन करता करता त्याच्या चरणी लीन होणारी कान्होपात्रा आणि विठ्ठल मंदिरातील खांबाजवळ उभी राहून आजही आपली ओळख देणारी कान्होपात्रा.
इतर पात्रांनी आपापल्या भूमिका तितक्याच समर्थपणे सादर करून त्यांना उत्तम साथ दिली.
सौ. ज्योती कुलकर्णी यांनी त्यांच्या सुरेल आवाजात सादर केलेल्या कान्होपात्राच्या भजनांमुळे कार्यक्रमाची उंची वाढली. अर्चना बक्षी या स्वतः कान्होपात्रमय झाल्या होत्या. आणि या संगीत नृत्यनाट्याचा उत्तम आविष्कार करून त्यांनी सर्वांनाच कान्होपात्रामय करून टाकले. यातच या कार्यक्रमाचे यश सामावलेले आहे.


अपर्णा जोगळेकर  


No comments:

Post a Comment